SpreadIt News | Digital Newspaper

मिस्ड कॉल दिल्यावर लगेच सुरू होणार कर्ज मिळवण्याची प्रोसेस, मिळणार 50 लाखांपर्यंत कर्ज, वाचा कसं ?

0

प्रत्येक व्यक्तीला पैशांची गरज पडतेच. यावेळी अनेक जण वैयक्तिक कर्जाचा आधार घेत असतात. परंतु वैयक्तिक कर्जाचे व्याजदर हे इतर कर्जांच्या तुलनेनं अधिक असतात. जर तुमच्याकडे सोन्याचे दागिने आहेत, तर ते बँकेकडे तुम्ही तारण ठेऊन कमी व्याजदरात कर्ज घेऊ शकता.

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ही वर्षाला 7.5 टक्के दरानं सोनं तारण ठेवून कर्ज देते तर वैयक्तिक कर्जाचे व्याजदर हे त्यापेक्षा जास्त असून ते वार्षिक 9.6 टक्के इतके आहेत.

Advertisement

सोनं तारण ठेवून स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना 50 लाख रूपयांपर्यंत कर्ज देत आहे. यासाठी कागदपत्रेदेखील तुलनेनं कमीच लागणार आहेत.

स्टेट बँकेच्या कॉन्टॅक्ट सेंटरवरून पुन्हा कॉल प्राप्त करण्यासाठी 7208933143 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल किंवा ग्राहकांना 7208933145 या क्रमांकावर GOLD असं लिहून एसएमएस करावा लागेल.

Advertisement

यानंतर तुम्ही सोनं तारण ठेवून कर्ज मिळवण्याची पुढील प्रक्रिया पूर्ण करा. स्टेट बँक तुम्हा ग्राहकांना फोन करेल आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाईल.

यात 18 वर्षावरील व्यक्ती कर्ज घेऊ शकते. यासाठी त्या वक्तीकडे कमाईचा स्रोत असणं आवश्यक आहे. ग्राहकांना 20 हजार रूपयांपासून 50 लाखांपर्यंत कर्ज घेता येणार आहे. सोन्याशिवाय सोन्याची नाणी तुम्ही तारण ठेवू शकता व कर्ज घेऊ शकता. यासाठी त्याच्या शुद्धतेचं प्रमाणपत्र आवश्यक आहे.

Advertisement

या कर्जासाठी ग्राहकांकडून कर्जाच्या रकमेच्या 0.25 टक्के आणि 250 रूपये शुल्क आकारलं जाईल. योनो मोबाईल ॲपवरून अर्ज केल्यास शुल्क आकारलं जाणार नाही.

अर्ज करण्यासाठी उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. तसंच यासाठी 7.5 टक्के व्याजदर आकारला जाईल. ज्या ग्राहकांनी स्टेट बँकचं गृहकर्ज घेतलं आहे त्यांच्यासाठी 7.3 टक्क्यांनी हे कर्ज देण्यात येईल.

Advertisement

रिपेमेंट पिरिअड किती मिळणार-

1) सोनं तारण कर्जासाठी 36 महिने
2) लिक्विड सोनं तारण कर्जासाठी 36 महिने
3) बुलेट रिपेमेंट सोनं तारण कर्जासाठी 12 महिने

Advertisement

कागदपत्रे कोणती लागतील ?

1) कर्जासाठी अर्ज करण्यासाठी दोन फोटो
2) अर्ज
3) ओळख आणि पत्त्याचा पुरावा,
4) लोन मिळण्याचा कालावधी – डीपी नोट आणि डीपी नोट टेक डिलिव्हरी लेटर
5) गोल्ड ऑर्नामेंट्स टेक डिलिव्हरी लेटर
अरेंजमेंट लेटर

Advertisement

Instant bank loan process with missed call

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement