SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आजही सोन्याचे दर कमीच! का होतेय सोन्याची किंमत सातत्याने कमी?

कोरोनाने जगभरात हाहाकार माजवल्यानंतर जगाची आर्थिक गाडी पुन्हा वेग घेत आहे, सगळं काही सकारात्मक असूनही सोन्याच्या दरात आश्चर्यकारक सातत्याने घट सुरु आहे.

आज दिनांक 8 मार्च रोजी सोन्याच्या दरांनी 44 हजार रुपये प्रती तोळा इतका दर गाठला आहे. असं बोललं जात की, येत्या दिवसांमध्ये हे दर आणखी कमी होण्याची चिन्हे आहेत.

Advertisement

2020 मध्ये भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या दरांनी 56 हजार रुपये प्रची तोळा अशी विक्रमी किंमत गाठली होती. आता मात्र अनेक देशांचा किंबहुना भारताचाही आर्थिक गाडा वेग धरु लागलेला असताना दर कमी होणं, हे मात्र कोडेच आहे.

आजची सोन्याची परिस्थिती (Silver Price on 8 March 2021)

Advertisement

वायदे बाजारात आज सोन्याच्या दरात 0.31 टक्क्यांनी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. ज्यामुळं हे दर प्रती 10 ग्रामसाठी 44,544 रुपयांवर पोहोचले. आंतरराष्ट्रीय बाजार, न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे दर 0.09 टक्क्यांनी कमी होऊन 1,697.00 डॉलर वर पोहोचलं.

चांदीची किंमत (Silver Price on 8 March 2021)

जागतिक मागणीत वाढ झाल्याने दिल्ली बुलियन मार्केटमध्ये चांदीचे दर 587 रुपयांनी वाढून 65,534 रुपयांवर गेले. गेल्या व्यापार सत्रात चांदीचा भाव प्रतिकिलो 64,947 रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी प्रति औंस 25.31 डॉलर होती.

Advertisement

सोने आठ महिन्यांत 12,086 रुपयांनी स्वस्त

यावेळी, ऑगस्ट 2020 च्या अखेरच्या उच्चांकाच्या तुलनेत सोने सुमारे 12,086 रुपयांनी स्वस्त झाले. ऑगस्टमध्ये ते 56200 च्या पातळीवर पोहोचले होते. गेल्या आठवड्यात दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किमतीत मोठी घसरण नोंदवली गेली. सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 522 रुपयांनी घसरली. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, कॉमेक्सच्या कमकुवततेमुळे 24 कॅरेट सोन्याच्या किमती दिल्लीत 122 रुपयांनी घसरल्या.

काय आहे सोन्याच्या दरात घट होण्याची नेमकी कारणे?

Advertisement

कोरोना लसीकरणाच्या सत्राला सुरुवात झालेली असतानाच सोन्याचे दर मात्र कमीच होत आहेत. अमेरिकन बॉण्ड यील्डमध्ये झालेली वाढ हेसुद्धा यामागचं एक कारण ठरत आहे. जगभरातील गुंतवणुकदार अमेरिकन बॉण्डमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या गुंतवणुकीचं प्रमाण कमी झालं आहे, याचाच परिणाम सोन्याच्या किमतीवर होत आहे.

तसेच, ‘वर्ल्ड गोल्ड काउंसिल’ इंडियाचे कार्यकारी अध्यक्ष पीआर सोमसुंदरम यांच्या मते बॉन्ड यील्ड वाढून सोन्याच्या दरांत घट झाल्यामुळं Gold ETFs ची होल्डिंग 2 टक्क्यांनी कमी झाली आहे.

Advertisement

सोन्याचे दर भविष्यात आणखी किती कमी होतील हे येणार कालच ठरवेल परंतु, जर तुम्हाला सोने खरेदी करायची असेल तर हि योग्य संधी आहे.

Advertisement