SpreadIt News | Digital Newspaper

🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

0

🗓️ रविवार, 7 मार्च 2021

मेष : नवीन मित्र जोडले जातील. आपला दबदबा निर्माण कराल. इतरांना मदत करण्याचा आनंद घ्याल. व्यावसायिक कामे काळजीपूर्वक करावीत. प्रत्येक काम जबाबदारीने पार पाडा.

Advertisement

वृषभ : जवळचे नातेवाईक भेटतील. तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जाईल. विषयाला फाटे फोडू नका. उत्कर्षाच्या दृष्टीने आजचा दिवस आपल्यासाठी अनुकूल आहे. जोडधंद्यातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल.

मिथुन : जवळचा प्रवास होईल. भावंडांशी सलोखा वाढेल. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. विचारात एकसूत्रता आणावी लागेल. भावंडांना मदत करावी. ज्या लोकांमुळे तुम्ही अडचणीत येता, अशा लोकांपासून लांब रहा.

Advertisement

कर्क : तुमच्या मताचा आदर केला जाईल. घरगुती वातावरणात गुंग व्हाल. आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील. प्रतिस्पर्ध्याची चाल पाहूनच पुढे वाटचाल करावी. तुम्हाला कोणीही आव्हान देण्याचा प्रयत्न करेल.

सिंह : जोडीदाराची प्राप्ती वाढेल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. मुलांची काळजी लागून राहील. धार्मिक शुभ समारंभात सतत सहभाग घ्यायला मिळेल.

Advertisement

कन्या : कामाच्या ठिकाणी कुशाग्र बुद्धीचा वापर कराल. घरात काही बदल करावे लागतील. स्थावरचे प्रश्न सोडवावेत. हितशत्रूंच्या कारवायांना मोठ्य़ा युक्तीवादाने सामोरं जावं लागेल.

तूळ : तुमच्यातील महत्वाकांक्षा वाढीस लागेल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. जवळच्या प्रवासात काळजी घ्या. नशिबाला साथ मिळेल. नोकरीत वरिष्ठांना मान देऊन आपली कामे करा. अचानक धनलाभाचा योग आहे.

Advertisement

वृश्चिक : कुटुंबात आपले वर्चस्व गाजवाल कर्तृत्व दाखवण्याची संधी सोडू नका. कौटुंबिक प्रश्न चर्चेने सोडवावेत. पराक्रमाला वाव मिळेल. लेखक, साहित्यिक, कवी, कलाकार यांना चांगल्या संधी लाभतील

धनु : क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. आपली बुद्धिमत्ता दाखवण्याची संधी मिळेल. परोपकाराची जाणीव ठेवाल.

Advertisement

मकर : शांत व संयमी विचार करावा. कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा लागेल. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. पराक्रमाला वाव मिळेल. लेखक, साहित्यिक, कवी, कलाकार यांना चांगल्या संधी लाभतील.

कुंभ : कामाचा वाढता व्याप लक्षात घ्या. वडीलधार्‍यांचा सन्मान करा. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. कलेस चांगला वाव मिळेल. प्रतिस्पर्ध्याची चाल पाहूनच पुढे वाटचाल करावी. तुम्हाला कोणीही आव्हान देण्याचा प्रयत्न करेल.

Advertisement

मीन : नातेवाईकांची मदत घेता येईल. सहकार्‍यांच्या साथीत रमून जाल. गोड बोलून सर्वांना आपलेसे कराल. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात सफलता लाभेल. प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीचा प्रत्यय येईल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement