SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

LPG सिलिंडर खरेदीवर ग्राहकांना 30 लाखांचा मोफत विमा मिळणार, कसा ते एकदा वाचाच!

LPG सिलिंडर घेतल्यास ग्राहकाला खूप सुविधा मिळतात. तर ग्राहकाने घेतलेल्या प्रत्येक सिलेंडरवर विमा असल्याने, ग्राहकांच्या कुटूंबाला विमा दिला जातो. हा विमा 3 प्रकारचा असून तो ग्राहकाला मोफत दिला जातो.

तसेच विम्याच्या माध्यमातून ग्राहक नुकसानीची भरपाई घेऊ शकतो. या 14 किलो गॅस सिलिंडरबरोबरच तुम्हाला अनेक प्रकारच्या सुविधा देखील मिळतात. या सिलिंडरबरोबरच प्रत्येक ग्राहकांच्या कुटूंबाला विमा देखील दिला जातो.

Advertisement

प्रत्येक सिलिंडरवर विमा असतो. दुर्दैवाने जर सिलिंडरचा स्फोट झाला किंवा तोटा झाला तर तुम्ही विमा वापरू शकता. या विम्याच्या माध्यमातून तुम्ही नुकसानीची भरपाई करू शकता. एलपीजी सिलिंडर देणार्‍या कंपन्या कोणत्याही अनुचित घटनेविरूद्ध विमा प्रदान करतात.

विमा किती प्रकारचे उपलब्ध आहेत हे जाणून घेऊया…

Advertisement

विम्यामध्ये अपघाती मृत्यू, जखमी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास LPG कंपन्या नुकसान भरपाईचे काही पैसे ग्राहकांना देते.

विम्यामध्ये काही नियम आहेत. घटना कशा प्रकारे घडली आणि आणखी किती व कोणत्या गोष्टींचा समावेश आहे. यावर विम्याची रक्कम आधारित असतो.

Advertisement

या 3 प्रकारच्या विम्यात नियमांनुसार भरपाईची रक्कम वेगळी असते. विम्यात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूवर त्याला जवळपास 6 लाख रुपयांचे संरक्षण असते.

तर घटनेत जखमी झालेल्यांसाठी 30 लाख रुपयांचा विमा आहे, त्यात एका व्यक्तीवर जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंत उपचार केले जातात आणि कोणतीही मालमत्ता गमावल्यास 2 लाख रुपये दिले जातात.

Advertisement

कोणतेही शुल्क न घेता मिळणार विमा?

विम्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क देण्याची गरज लागत नाही. भारतातील तेल बाजारातील कंपन्या ग्राहकांकडून प्रीमियम रकमेसाठी कोणतेही पैसे आकारत नाहीत. कोणतीही घटना घडल्यास विमा कंपन्या तेल कंपन्यांना ही रक्कम हस्तांतर करतात. तसेच येत्या 2 वर्षांत सरकार आपल्या देशातील नागरिकांना 1 कोटी मोफत LPG कनेक्शनचे वितरण केले जाणार आहे. त्याची आता तयारीही होत आहे. भारतातील प्रत्येक घरात LPG कनेक्शन मिळवून देण्यासाठी सरकार उज्ज्वला गॅस योजना चालवत आहे. तसेच, सरकार अल्प दस्तऐवजमधील LPG कनेक्शन देण्याचाही प्रयत्न करत आहेत. यासोबतच सरकारने बदललेल्या नियमांमध्ये रहिवासी दाखला नसतानाही LPG कनेक्शन देण्याची योजना आहे अशी माहिती तरुण कपूर यांनी दिली आहे.

Advertisement


तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन कराhttps://cutt.ly/joinspreadit

Advertisement