SpreadIt News | Digital Newspaper

😳 लक्ष द्या ! 31 मार्चआधीच पॅन कार्ड आधारशी अस लिंक करा; नाहीतर..

भारतीयांना त्यांच्या ओळ्खपत्राविषयी माहिती असणं गरजेचं आहे. पॅन कार्ड आणि आधार कार्ड देशातील नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट, ओळखपत्र आहे. ते अपडेट करणं महत्वाचं असतं. अशाच प्रकारे इनकम टॅक्स रिटर्न करतानाही पॅन कार्डसह आधार नंबर देणं आवश्यक असतं.

…तर भरावा लागू शकतो दंड

Advertisement

भारत सरकारने यापूर्वी पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत 30 जून 2020 वरून वाढवून 31 मार्च 2021 केली आहे. त्यामुळे दिलेल्या तारखेपर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यास, त्यांना दंड भरावा लागेल आणि 1 एप्रिल 2021 पासून त्यांचं पॅन कार्ड इनअ‍ॅक्टिव्ह होईल.

इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या माहीतीनुसार तुम्ही पॅन सरकारने दिलेल्या कालावधीत आधारशी लिंक न केल्यास, ते इनअ‍ॅक्टिव्ह होईल.

Advertisement

त्यामळे त्याचा कुठेही वापर करता येणार नाही.
पॅन कार्ड धारकांना विना पॅन कार्डधारक मानलं जाईल, त्याशिवाय तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 272 बी अंतर्गत 10,000 रुपयांचा दंडही भरावा लागू शकतो, अशी माहीती आहे.

पॅन कार्ड, आधार कार्डशी कसं लिंक कराल?

Advertisement

तुम्हाला पॅन आधारशी लिंक करण्यासाठी प्रथम http://www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल. येथे Link Aadhaar असा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करा. आता त्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल.

या विंडोमध्ये आधार नंबर, पॅन नंबर, नाव, कॅप्चा कोड भरावा लागेल. त्यानंतर Link Aadhar वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक होईल.

Advertisement

SMS द्वारेही लिंक करता येणार –

आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी 567678 किंवा 56161 वर एसएमएस पाठवावा लागेल. यासाठी UIDAIPAN (12 अंकी आधार नंबर) स्पेस (10 अंकी पॅन नंबर) असा मेसेज पाठवा आणि लिंक करा.

Advertisement