Take a fresh look at your lifestyle.

योगासने करताना नियम पाळा, ‘ही’ काळजी घ्याल तर आरोग्य उत्तम राहील..

0

उत्तम आरोग्य हवं असण्यासाठी योगा करणे हा सर्व आजारांवरचा उपाय आहे, मग तो शारीरिक असो वा मानसिक असो. दररोज योगा केल्याने फायदेशीर असतो, कारण त्याने माणूस शारीरिक आणि मानसिक दृष्टया सुदृढ राहतो.

मोठ्या मोठ्या आजारांना दूर करण्यासाठी योगा आवश्यक आहे आणि महत्त्वाचे आहे. प्रत्येक गोष्ट करताना काही नियम व पद्धती असतात त्याप्रमाणे योगा करताना काही नियम असतात, ज्यांना पाळून योगाभ्यास केल्याचा आरोग्यास फायदा होतो.

Advertisement

योगा करताना काय-काय नियम पाळावेत, वाचा..

  • एखाद्या गुरूच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास सुरु करा.
  • योगाभ्यास करण्याची योग्य वेळ – सूर्योदय किंवा सूर्यास्त
  • योगा करण्याच्या पूर्वी आंघोळ करा.
  • योगा नेहमी रिकाम्या पोटी करावा. योगा करण्यापूर्वी काहीच खाऊ नये.

 

Advertisement
  • आरामदायक, सैल सुती कापडे घाला.
  • शरीर जितकं स्वच्छ असेल, तितकं मन देखील स्वच्छ हवं, हे विसरू नका.
  • योगा करण्यापूर्वी सर्व नकारात्मक अथवा वाईट विचारांना मनातून काढून टाका.
  • एखाद्या शांततेच्या ठिकाणी आणि स्वच्छ जागेवर योगा करा.
  • आपले संपूर्ण लक्ष योगाभ्यासावर द्या.

 

  • योगा नेहमी संयम आणि चिकाटीने करा.
  • आपल्या शरीरावर बळजबरी किंवा जबरदस्तीने ताण होईल असं काही करू नका.
  • धैर्य ठेवा! योगाचे फायदे मिळण्यास वेळ लागतो. सतत योगाभ्यास सुरू ठेवा.
  • योगा केल्यावर अर्धा तास काहीच खाऊ नका. तासाभराने अंघोळ करा.
  • प्राणायाम नेहमी आसन केल्यावर करा.

 

Advertisement
  • कोणतीही शारीरिक त्रास असल्यास योगा करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • योगा करताना काही त्रास वाढू लागत असल्यास किंवा नवीन समस्या उद्भवल्यास योगा थांबवून विश्रांती घ्या.
  • खाण्या-पिण्यात संयम बाळगा.
  • गरोदरपणात एखाद्या योगगुरूच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास करणे उत्तम होईल.
  • योगासनांच्या शेवटी नेहमी शवासन करावे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit

Advertisement

Leave a Reply