SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अवघ्या 5 मिनिटात 3 लाख जणांनी खरेदी केला हा स्मार्ट फोन

शाओमीच्या फोनची विक्रीचा आणखी एक रेकॉर्ड बनवला आहे. शाओमीची सब ब्रँड कंपनी रेडमी ने आपली रेडमी के 40 सीरीजला लाँच केले आहे. सध्या या सीरीजला चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. रेडमी के 40 सीरीजला गेल्या महिन्यात चीनमध्ये लाँच केले होते. आता कंपनीने रेडमी के 40 वरून एक मोठा दावा केला आहे. पहिल्याच सेलमध्ये या सीरीजचे 3 लाख स्मार्टफोनची विक्री करण्यात आली आहे.

3 लाख स्मार्टफोनची विक्री केवळ पहिल्या सेलमध्ये फक्त 5 मिनिटात झाली आहे. रेडमी के 40 सीरीजचे तीन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहे. ज्यात Redmi K40, Redmi K40 Pro आणि Redmi K40 Pro+ या स्मार्टफोनचा समावेश आहे. या फोनचा पुढचा सेल 8 मार्च रोजी होणार आहे.

Advertisement

Redmi K40, Redmi K40 Pro आणि Redmi K40 Pro+ तिन्ही स्मार्टफोनमध्ये अँड्रॉयड 11 वर आधारित एमआययूआय 12 दिले आहे. Redmi K40 मध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज आहे. डिस्प्लेमध्ये पंचहोल दिला आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर, 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंत स्टोरेज दिले आहे. या फोनमध्ये चार रियर कॅमेरे आहे. ज्यात 48 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तर सेल्फीसाठी फोनमध्ये 40 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4520 एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. 33 वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे.

Redmi K40 Pro आणि Redmi K40 Pro+ च्या फीचर्स मधील क्वॉलिटी रेडमी के 40 सारखीच आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर दिला आहे. रेडमी के 40 प्रो मध्ये 8 जीबी पर्यंत रॅम आणि Redmi K40 Pro+ फोनमध्ये 12 जीबी पर्यंत रॅम दिले आहे. Redmi K40 Pro+ फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. सेल्फीसाठी या दोन्ही फोनमध्ये 40 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. Redmi K40 Pro+ मध्ये प्रायमरी लेन्स 108 मेगापिक्सलची आहे. या दोन्ही फोनमध्ये 256 जीबी पर्यंत स्टोरेज आणि कनेक्टिविटी साठी सर्व आवश्यक फीचर्स दिले आहेत.

Advertisement