SpreadIt News | Digital Newspaper

😞 मुथूट ग्रुपचे सर्वेसर्वा एमजी जॉर्ज मुथूट यांचे निधन!

0

💁🏻‍♂️ ‘मुथूट ग्रुप’मधील’ मुथूट फायनान्स’ ही देशातील सर्वात मोठी नॉन-बँकिंग गोल्ड लोन वित्तीय कंपनी आहे हे आपल्याला माहीतच आहे.

🧐 या मुथूट ग्रुपचे अध्यक्ष एमजी जॉर्ज मुथूट यांचे शुक्रवारी संध्याकाळी निधन झाले. जॉर्ज मुथूट 72 वर्षांचे होते.

Advertisement

😥 एमजी जॉर्ज मुथूट त्याच्या घराच्या पायऱ्यांवरून पाय घसरून पडले. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एस्कॉर्ट्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.

😔 शुक्रवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास त्यांना रुग्णालयातच मृत घोषित करण्यात आले.

Advertisement

👉 जॉर्ज मुथूट यांचा जन्म 2 नोव्हेंबर 1949 रोजी केरळमध्ये झाला होता.

💁‍♀️ एमजी जॉर्ज मुथूट हे मुथूट समूहाचे अध्यक्षपद भूषवणारे कुटुंबातील तिसर्‍या पिढीचे सदस्य होते.

Advertisement

👍 त्यांच्या कारकिर्दीत मुथूट ग्रुप एका वेगळ्या स्थानावर जाऊन पोहोचले होते. आजही मुथूट ग्रुप सामान्यातल्या सामान्य लोकांना माहित आहे त्याचे कारण त्यांची मेहनत आणि सातत्य आहे.

💫 मुथूट ग्रुप ही भारतातील सर्वात मोठी गोल्ड कंपनी बनली असून, सध्या या कंपनीचे बाजारमुल्य 51 हजार कोटी रूपये आहे तर, 8 हजार 722 कोटी उत्पन्न आहे. आज या ग्रुपच्या जगभरात 5 हजार शाखा आहेत.

Advertisement

▶️ ही पदे भूषवली

◼️केरळातील ऑर्थोडॉक्स चर्चचे विश्वस्त

Advertisement

◼️फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) च्या राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्य

◼️केरळ राज्य परिषदेचे अध्यक्ष

Advertisement

🎯 फॉर्ब्सच्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत नाव!

📌 अनेक महत्त्वाची पदे त्यांनी त्यांच्या कार्यकाळात भूषवली. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की, फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये देखील त्यांनी स्थान मिळवले होते. ही भारतासाठी खरंच खूप महत्त्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement