SpreadIt News | Digital Newspaper

स्प्रेडइट टॉप ट्रेंडिंग न्युज..

0

राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 4489 कोटी निधी वितरित!

राज्यात जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान तसेच इतर हानी यासाठी 9 नोव्हेंबर 2020 च्या शासन निर्णयाद्वारे 2 हजार 297 कोटी तर 7 जानेवारी 2021 च्या शासन निर्णयाप्रमाणे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी 2 हजार 192 कोटी असे एकूण 4 हजार 489 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे.

Advertisement

बुमराह चे कॅप्टनच्या पावलावर पाऊल; अनुपमा परमेश्वरम या मल्याळम अभिनेत्रीशी बांधणार लग्नगाठ!

जसप्रीत बुमराह याच्या लग्नाच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत असतानाच त्याची बायको नेमकी कोण आहे? यावर विविध मतमतांतरे समोर येत होती. आता तिचे नाव समोर आले असून, तो एका मल्याळम अभिनेत्री लग्नगाठ बांधणार असून तिचे नाव अनुपमा परमेश्वरम आहे, अशी माहिती मिळत आहे!

Advertisement

आनंदाची बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळी पूर्वी मिळू शकतो महागाई भत्ता

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता आणि त्याविषयी सरकारची घोषणा याबद्दल आता एक आनंदाची बातमी कळत आहे. होळी पूर्वी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता बाबत घोषणा करू शकते असा अंदाज बांधला जात आहे. महागाई भत्त्याची पातळी पूर्वीइतकीच ठेवण्यात येईल, असाही कयास तज्ञ लावत आहेत. याद्वारे तब्बल 52 लाख कार्यरत कर्मचारी आणि 60 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना फायदा होऊ शकतो!

Advertisement

आयपीएलचे सामने मुंबईत होणार? बीसीसीआयच्या सदस्यांनी घेतली शरद पवारांची भेट!

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील आयपीएलचे सामने रद्द करण्याचा विचार राज्य सरकार करत असतानाच, बीसीसीआयच्या सदस्यांनी शरद पवार यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर येत आहे. शरद पवारांनी या बैठकीदरम्यान राज्य शासनाकडून जे काही शक्य होईल ते करण्याची हमी बीसीसीआयच्या सदस्यांना दिली आहे. या चर्चेमध्ये मुंबईत सामने 50% प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळण्याच्या प्रस्तावावर देखील चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

Advertisement

तावडे नावाच्या व्यक्तीचा क्राइम ब्रांच मधून कॉल… मनसुख हिरेन गेले ते परत आलेच नाहीत! पत्नीची धक्कादायक माहिती

काही दिवसापूर्वी अंबानींच्या घराबाहेर स्फोटके आढळून आली. तिथे पार्क असलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा झालेला मृत्यू या सगळ्या प्रकरणाची गूढता अजून वाढवत आहे. त्यांची पत्नी विमला हिरेन यांनी पतीच्या मृत्यू आधीचा घटनाक्रम सांगितला. यामध्ये बोलताना त्यांनी “क्राईम ब्रांचच्या तावडे नावाच्या व्यक्ती चा कॉल आला, ते बाहेर गेले आणि परतलेच नाहीत!” असे धक्कादायक विधान केले आहे. हे बोलत असतानाच, आपला पती आत्महत्या करू शकत नाही हे देखील त्यांनी नमूद केले.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement