SpreadIt News | Digital Newspaper

जबरदस्त.. आता येणार ‘जिओ’चा स्वस्तात लॅपटॉप – ‘जिओबुक’

जिओ ही कंपनी स्वस्त फोन आणि स्वस्त रिचार्ज देण्यासाठी सामान्यांमध्ये प्रसिद्ध आहे. आता लॅपटॉप च्या क्षेत्रातदेखील आपले नशीब आजमावण्यासाठी जिओ सज्ज झाले आहे. सामान्यांना स्वस्तात लॅपटॉप उपलब्ध करून देण्याचा मानस ठेवून, जीओ लवकरच जिओ बुक नावाच्या लॅपटॉप बद्दल घोषणा करण्याची शक्यता आहे!

अशी माहिती मिळत आहे की हा लॅपटॉप फोकर्ड अँड्रॉइड बिल्ड वर आधारित असून त्याला जिओच्या ओ एस वर डब करता येणार आहे. याचे फर्मवेअर जिओ ॲप सह येऊ शकते.

Advertisement

2018 मध्ये जो अहवाल समोर आला. त्यात या जिओ बुक मध्ये 4G एलटीइ सपोर्ट असेल असे सांगण्यात आले होते. जिओ बुक लॉन्च करण्यासाठी चीनच्या ब्लू बँक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बरोबर भागीदारी झाली आहे. या कंपनीमध्ये जिओ फोन देखील बनवले जात आहेत.

एक्सडीए डेव्हलपर्स कडून अशी नोंद करण्यात आली आहे की, जिओ बुकच्या सध्याच्या प्रोटोटाइप मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 665 एसओसीसह एक 1366 × 768 पिक्सेल रिझर्वेशन डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन एक्स 124 जी मोडेम असू शकेल.

Advertisement

एका मॉडेल मध्ये 2 जीबी एलपीडीडीआर 4 एक्स रॅम आणि 32 जीबी इएमएमसी स्टोरेज आहे. दुसऱ्या एका मॉडेल मध्ये 4जीबी एलपीडीडीआर आणि 4 एक्स रॅम आणि 64 जीबी इएमएमसी 5.1 स्टोरेज देखील आहे.

कनेक्टिविटी ऑफर्स मध्ये मिनी एचडीएमआय कनेक्टर, ब्लूटूथ, ड्युअल बँड वाय फाय इत्यादी असू शकतात.

Advertisement

तसेच जिओबुक मध्ये थ्री ॲक्सिस एक्सलेरोमिटर देखील असू शकते.

Advertisement