SpreadIt News | Digital Newspaper

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची तारीख निश्चित; ‘या तारखेला’ हंगामाची सुरुवात आणि ‘या तारखेला’ होणार फायनल!

0

आयपीएलचा 14वा हंगाम 9 एप्रिलपासून सुरु होईल, असं वृत्त एएनआय या वृत्त संस्थेने दिेले आहे. आता फक्त आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत याला मंजुरी अजून मिळालेली नाही.

9 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेची फायनल 30 मे रोजी खेळवली जाईल. असे वृत्त असले तरी निश्चित वेळापत्रक पुढच्या आठवड्यात येईल.

Advertisement

गव्हर्निंग कौन्सिलच्या निर्णयानुसार 30 मे रोजी फायनल खेळवले जाण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र यावर शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.

मात्र, आम्ही या निर्णयप्रक्रियेमध्ये नसतो त्यामुळे निश्चित काही सांगता येणार नाही.

Advertisement

तरीदेखील, पुढच्या आठवड्यामध्ये अंदाजे वेळापत्रकानुसार, जी माहिती आहे त्याप्रमाणे आयपीएलचे सामने खेळविले जातील अशी चिन्हे आहेत.

9 एप्रिल आयपीएल चा 14 वा हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आयपीएलच्या चाहत्यांना आता उत्सुकता लागून राहिलेली आहे. पुढच्या आठवड्यात काय निर्णय होतो आणि सामने कुठे खेळले जातात.

Advertisement

याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. मुंबईत सामने होणार की नाही? याबाबत बीसीसीआयच्या सदस्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती.

त्याचे फलश्रुत आता काय होते? आणि मुंबईत सामने प्रेक्षकांसहित किंवा प्रेक्षकांविना कसे खेळले जातात? किंबहुना खेळवले जातात की नाही? हा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Advertisement

महाराष्ट्र शासनाने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील सामने रद्द केले होते. त्यावर आता शरद पवार यांनी दिलेल्या आश्वासनानुसार पुढे काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Advertisement