SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

💁‍♂️ शेतकऱ्यांसाठी खुशखबर पंतप्रधान किसान योजनेत मोठा बदल, आता लाभार्थ्यांची यादी होणार डिस्प्ले; सविस्तर फायदे घ्या जाणून..

👉 पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही नरेंद्र मोदी सरकारची महत्वकांक्षी योजना असून, त्याअंतर्गत पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात. दरम्यान या योजनेत अनेक गैरव्यवहार झाल्याचे दिसून आले. आता या गैरव्यवहाराला लगाम घालण्यासाठी आणि जे खरे शेतकरी आहेत त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे.

🤔 नेमके ‘या’ योजने अंतर्गत काय..:

Advertisement

▪️ मोदी सरकारने सर्व ग्रामपंचायतींमध्ये या योजनेच्या लाभार्थ्यांची यादी डिस्प्ले करण्याचे निर्देश दिले असून, प्रत्येक राज्य सरकारांना हे काम करावे लागणार आहे. जेणेकरुन बनावट शेतकरी त्याचा फायदा घेऊ शकणार नाही. तर आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे कोण लाभ घेत आहे हे प्रत्येक ग्रामस्थांना कळेल. यामुळे बनावट लाभार्थ्यांची ओळख पटणे सुलभ होईल.

▪️ एवढेच नव्हे तर या योजनेचे सोशल ऑडिट करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. जेणेकरून अपात्र शेतकऱ्यांना या यादीतून वगळण्यास येईल, जे अजूनही वर्षाकाठी 6000 रुपये घेत आहेत. हे ऑडिट पटवारी व तहसीलदार यांच्या सूचनेवरून ग्रामपंचायत स्तरावर केले जाईल.

Advertisement

🗣️ केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार..:

▪️ आतापर्यंत 231 कोटींची वसुली झाली असून, अद्यापही 17 राज्यांमधून एक रुपयाही वसूल झालेला नाही. बिहार सरकारने बनावट शेतकर्‍यांची रिकवरी लिस्ट यापूर्वीच जाहीर केली आहे.

Advertisement

▪️ ज्यामध्ये प्रत्येक ग्रामसभेतील शेतकऱ्याची नावे व फोन नंबर देण्यात आले आहेत, ज्यांनी पंतप्रधान किसान योजनेचा बेकायदेशीरपणे लाभ घेतला आहे.

📍 दरम्यान, नरेंद्र मोदी यांची ही ड्रीम पंतप्रधान किसान योजना आतापर्यंतची सर्वात मोठी शेतकरी योजना असून, ज्यावर दरवर्षी 75 हजार कोटी रुपये खर्च करण्याचे केंद्राचे लक्ष्य आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement