SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

1 एप्रिल पासून ड्रायव्हरसह बाजूच्या सीटवर बसलेल्या प्रवाशासाठी एअरबॅग अनिवार्य

1 एप्रिल 2021 नंतर उत्पादित होणाऱ्या वाहनांसाठी समोरच्या सीटवर ड्रायव्हरसह बाजूच्या सीटवर बसलेल्या प्रवाशासाठी एअरबॅग अनिवार्य करण्यात अली आहे. यासाठी केंद्र सरकारने अधिसूचनाही जारी केली आहे.

वाहनांचा अपघात होतो तेव्हा सर्वाधिक धोका समोरच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीला असतो. जर वाहनांची समोरासमोर धडक झाली तर समोरच्या सीटवर बसलेला प्रवासी दगावला जाऊ शकतो त्यामुळे हा नियम लागू केला आहे. त्यामुळे कार किंवा प्रवासी वाहनात समोरच्या बाजूला बसलेल्या प्रवाशासाठी एअरबॅग आता सक्तीचे असणार आहे.

Advertisement

मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाहनांमध्ये ड्रायव्हर सीटबरोबर बसलेल्या प्रवाशासाठी एअरबॅग अनिवार्य करण्यासंबंधी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. हा एक अत्यंत महत्त्वाचा सुरक्षा उपाय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीने याबाबत उपाय सुचवले होते.

मंत्रालयाने म्हटले की, एप्रिल 2021 च्या सुरुवातीपासून वाहनाच्या समोरच्या सीटवर बसलेल्यांसाठी एअरबॅग आवश्यक असेल. तर जुन्या वाहनांसंदर्भात 31 ऑगस्ट 2021 मध्ये सध्याच्या मॉडेलमध्ये ड्रायव्हर सीटसह एअरबॅग असणे आवश्यक आहे. या निर्णयामुळे अपघातावेळी प्रवाशांची सुरक्षा निश्चित होईल.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit

Advertisement