SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

स्पेक्ट्रम म्हणजे नक्की असतं तरी काय ? टेलिकॉम कंपन्यांचा हा महत्वाचा भाग का असतो, जाणून घ्या..

आपण ल स्पेक्ट्रम हा शब्द ऐकला असेलच. काहींना याची पुरेसी माहिती नसेल. स्पेक्ट्रम काय असतो. त्याचा टेलिकॉम क्षेत्रात काय वापर होतो, हे आपल्याला क्वचितच माहिती असेल. सध्या स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू असल्यामुळे याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, आणि वोडाफोन आयडियाकडून स्पेक्ट्रमची बोली लावली जात आहे. पहिल्या दिवशी 77 हजार 146 कोटी रुपयांची बोली मिळाली आहे. आता देशात सुरू असलेल्या स्पेक्ट्रम लिलावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Advertisement

​स्पेक्ट्रम म्हणजे काय ?

स्पेक्ट्रम हे तुमच्याकडे असलेल्या फिचर फोन, अँड्रॉइड व इतर कोणत्याही मोबाईलच्या 2G आणि 3G आणि 4G नेटवर्कशी संबंधित आहे.

Advertisement

सोप्या शब्दात माहितीनुसार सांगायचं झालं तर , स्पेक्ट्रमचा संबंध मोबाईल इंडस्ट्री आणि अन्य क्षेत्रासाठी एयरवेब्ससाठी म्हणजेच संचारसाठी रेडिओ फ्रीक्वेंसी आहे.

याने कव्हरेज आणि क्षमता बँडद्वारे कोणतीही मोबाईल ऑपरेटर जास्तीत जास्त लोकांना जोडले जाऊ शकते. तसेच वेगाने स्पीड उपलब्ध केले जाते. हे स्पेक्ट्रम त्या विकीरण उर्जाचे नाव आहे, जे जमिनीवर चारही बाजुंनी असते. याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन (IMR)चा मुख्य स्त्रोत सूर्य आहे.

Advertisement

आपल्याला माहीतच असेल की, टेलिकॉम कंपन्या युजर्संना मोबाईल आणि इंटरनेट सर्व्हिस उपलब्ध करण्यासाठी स्पेक्ट्रमचा वापर करतात. याचे महत्त्व खूप आहे. कारण, मोबाईल आणि टेलिव्हिजनमध्ये रेडिओ इलेक्ट्रोमॅग्नेटिकचा वापर करतात. त्यामुळे मोबाईल आणि टीव्ही सर्व्हिसेससाठी याचा वापर अत्यंत गरजेचा आहे.

वापर कसा करतात ?

Advertisement

जर कोणतीही कंपनी कोणत्या स्पेक्ट्रमचा व्यापार म्हणून वापर करू इच्छित असेल तर त्याआधी त्यांना तरंगची लांबी, फ्रीक्वेंसी व उर्जा किती दूरपर्यंत घेऊन जाऊ शकते. याची माहिती असणं गरजेचं असतं.

टेलिकॉम सेक्टरमध्ये रेडियो वेब्सचा वापर केला जाऊ शकतो. कारण, ही सर्वात मोठी तरंगे असतात. त्यामुळे असे म्हणणे चुकीचे होणार नाहीत की, टेलिकॉम सेक्टरसाठी रेडियो वेब तरंगाने होते.

Advertisement

स्पेक्ट्रमचा लिलाव- 2015 मध्ये स्पेक्ट्रमचा लिलाव झाला होता. त्यावेळी याची वैधता 5 वर्षासाठी केली होती. कारण, 5 वर्षानंतर 2021 मध्ये याची पुन्हा एकदा लिलाव करण्यात येत आहे. या लिलावाचे खास वैशिष्टये म्हणजे जी कंपनी हा लिलाव मिळवण्यात यशस्वी होईल, त्या कंपनीला 20 वर्ष वैधता दिली जाणार आहे. यासाठी खासगी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया ने 13 हजार 475 कोटीच्या सुरुवातीच्या अर्नेस्ट मनी डिपॉझिट (EMD) जमा केले आहे.

Advertisement