SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रेल्वे प्रवास होणार मनोरंजनात्मक, प्रवासात कंटाळा येणारच नाही, ‘हे’ सगळं आता रेल्वेत करता येणार

अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेली कंटेंट ऑन डिमांड (COD) ही सेवा याच म्हणजेच मार्च महिन्यापासून सुरू होणार आहे. भारतीय रेल्वे मंत्रालयाने ही सेवा या महिन्यापासून सुरू करण्याची मंजुरी दिली आहे.

रेल्वे प्रवाशांना आता यामुळे मनोरंजनासाठी खूप चांगल्या व नवनवीन सुविधा मिळणार आहे. याबद्दल भारतीय रेल्वेतील पीएसयू रेलटेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरूवारी ही माहिती दिली.

Advertisement

काय असतील नवीन मनोरंजनात्मक सुविधा –

कंटेंट ऑन डिमांड या सेवेमध्ये जर तुम्ही प्रवास करत असाल तर धावत्या रेल्वे प्रवासात प्रवाशांना त्यांच्या डिव्हाईसवर (मोबाईल किंवा अन्य उपकरण) चित्रपट, बातम्या, म्युझिक व्हिडीओ असा बहुभाषिक कंटेट उपलब्ध करुन दिला जाईल.

Advertisement

यासोबतच अजून एक खास गोष्ट म्हणजे रेल्वेने प्रवाशांसाठी प्रवासात नेटवर्कमुळे स्ट्रीमिंग बफर होऊ नये, यासाठी रेल्वेच्या डब्यात मीडिया सर्व्हर ठेवलं जाणार असल्याची माहीती आहे.

या मीडिया सर्व्हरमुळे प्रवाशांना प्रवास करताना धावत्या रेल्वेतही आपल्या डिव्हाईसमध्ये हाय क्वालिटी बफर फ्री (लोड न होता व्हिडीओ, गाणे पाहता येणार) स्ट्रीमिंगची सेवा मिळेल, याचा एक फायदा असाही होईल की नेटवर्क नसताना बफर फ्री कंटेंट पाहताना तुमचा वेळपण वाचेल, असं रेलटेलचे सीएमडी पुनीत पुनावाला यांनी सांगितलं.

Advertisement

सुरुवात ‘येथून’ होणार ?

5 हजार 723 उपनगरी रेल्वे(लोकल)
8 हजार 731 ट्रेन
वाय-फाय असणाऱ्या 5 हजार 952 रेल्वे स्थानकांवर

Advertisement

पश्चिम रेल्वेमार्गावर एक राजधानी एक्सप्रेस आणि एका एसी लोकलमध्ये या खास सुविधेचं काम पूर्ण होत आहे, आता शेवटच्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. यामध्ये रेल्वे आणि रेलटेलमध्ये 50-50 टक्के महसूल विभागून घेतला जाणार आहे. पीएसयूला या प्रकल्पामधून किमान 60 कोटी रुपयांच्या वार्षिक उत्पन्नाची अपेक्षा आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement