SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या…

🗓️ शुक्रवार, 5 मार्च 2021

मेष : उत्तम सहकार्य लाभेल. जवळचे नातेवाईक भेटतील. अधूनमधून कामात चंचलता जाणवेल. लहानांशी मैत्री कराल. इतरांच्या आनंदात सुख मानाल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. मोठ्या व्यक्तींचा सल्ला उपयोगी पडेल. प्रवासात त्रास संभवतो.

Advertisement

वृषभ : विचारातून रागिटपणा दर्शवाल. वडिलांचे मत विरोधी वाटू शकते. आपल्या बुद्धिमत्तेचा अचूक वापर करता येईल. जोडीदाराच्या सहकार्याने कामे पार पडतील. मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातील. कामात चंचलता आणू नका.

मिथुन : प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल. गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. कामाचे योग्य नियोजन करावे. कामे वेळेत पूर्ण करण्यास भर द्या. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. जिद्द सोडून चालणार नाही.

Advertisement

कर्क : जवळच्या प्रवासाची मजा घ्याल. मित्र कमवाल. आपल्या छंदाला अधिक वेळ द्यावा. शांतपणे विचार करावा. राजकीय-धार्मिक कार्यात सहभाग नोंदवाल. धर्मादाय संस्थेस मदत कराल.

सिंह : काही गोष्टी दिरंगाईने पार पडतील. पायाचे त्रास दुर्लक्षित करू नका. कफ विकाराचा त्रास संभवतो. सामाजिक वजन वाढेल. घरासाठी नवीन काहीतरी खरेदी केले जाईल. पराक्रमाला वाव मिळेल.

Advertisement

कन्या : बौद्धिक दृष्टीकोन ठेवावा. दिवस आनंदात घालवाल. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. घरातील प्रश्नांकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. दिवस आळसात घालवाल. मनात मोठमोठ्या कल्पना रचल्या जातील. भावंडांशी मतभेद संभवतात.

तूळ : घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. चिकाटीने कामे करण्यावर भर द्यावा. योग्य समतोल राखण्याचा प्रयत्न करावा. द्विधा मन:स्थितीतून बाहेर यावे. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. पैशांच्या बाबतीत व्यवहार टाळावेत.

Advertisement

वृश्चिक : तुमच्या पराक्रमाला चांगला वाव मिळेल. पटकन निराश होऊ नका. काही गोष्टींचा सखोल विचार करावा. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. आवडत्या गोष्टी करण्याकडे कल राहील.

धनु : चिकाटीने अनेक कामे हाती घ्याल. व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल. कंजूषपणा दाखवू नका. अगदी मोजकेच बोलाल. कौटुंबिक रुबाब दाखवाल. हातातील कामाकडे लक्ष द्यावे. बदल स्वीकारावेत. भावंडांना मदत करावी.

Advertisement

मकर : चटकन निराश होण्याचे कारण नाही. अडथळ्यातून मार्ग निघेल. सर्वांच्या आनंदात सहभागी व्हाल. तुमचा मान-सन्मान वाढेल. जवळचा प्रवास सुखकारक होईल. काही गोष्टी उकरून काढू नका.

कुंभ : काही मापदंड ठरवून घ्यावेत. आलेल्या संधीचा लाभ उठवावा. विना कामाच्या गप्पा मारण्यात रंगून जाल. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आनंदी वृत्तीने वागाल. बौद्धिक तरलता दिसून येईल. दूरदृष्टीने निर्णय घ्याल.

Advertisement

मीन : मानाने कामे हाती घ्याल. काहीसे स्व‍च्छंदीपणे वागाल. गरजेच्या वस्तू खरेदी कराल. जोडीदाराचा प्रेमळपणा दिसून येईल. वातावरण खेळीमेळीचे राहील. मनातील गैरसमज बाजूस सारावेत. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. कमिशनच्या कामात लक्ष घालाल.

Advertisement