SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

या आर्थिक वर्षात पीएफ वर मिळणार ‘इतके टक्के’ व्याज… जाणून घ्या सविस्तर!

यावर्षीच्या मोठ्या बातम्यांमध्ये एक बातमी सतत पाहायला मिळाली आणि ती म्हणजे, कर्मचार्‍यांच्या भविष्यनिर्वाह निधी मध्ये व्याजदर किती मिळणार याबाबतची!

कर्मचारी एका विशिष्ट कालावधीपर्यंत एखाद्या संस्थेमध्ये किंवा कार्यालयात काम करतात. त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना भविष्य निर्वाह निधीची गरज जास्त भासते आणि तोच त्यांचा आधार असतो.

Advertisement

यंदा पी एफ वर किती व्याज मिळणार याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या असताना महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

यंदाच्या वर्षी पीएफवर मिळणाऱ्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. या आर्थिक वर्षात सुद्धा पीएफवर 8.5 टक्के व्याज मिळणार आहे.

Advertisement

ईपीएफओ केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या श्रीनगरच्या बैठकीमध्ये आज हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ईपीएफओ च्या 6 कोटी सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ईपीएफओ संघटना प्रत्येक आर्थिक वर्षात पीएफ रकमेवर किती व्याज मिळणार? त्याचे दर जाहीर करत असते.

Advertisement

गेल्या वर्षी मार्चमध्ये या संघटनेने व्याजदर कमी करून साडेआठ टक्‍क्‍यांवर आणला होता. यंदाही त्याच टक्केवारीने व्याजदर मिळणार आहे.

या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली ज्यात स्रोतांची गुंतवणूक, त्यावरील उत्पन्न, आणि कोविड यांच्या परिणामावर आधारित व्याजदराचा साठीचा अहवाल एका समितीने सादर केला. व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही.

Advertisement

अंतिम निर्णय मात्र, अर्थमंत्रालय घेत असते. तो अंतिम निर्णय अजून झालेला नाही. ईपीएफ बोर्ड स्वतःच्या शिफारसी वित्त मंत्र्यांकडे पाठवेल. त्यानंतरच, त्यावर निर्णय होईल.

Advertisement