SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

💡 राज्यात 1 एप्रिलपासून वीज 2 टक्क्यांनी होणार स्वस्त

🛢️ देशात इंधन दरवाढ आणि सक्तीच्या वीज देयक वसुलीने हैराण सामान्य नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे. नियामक आयोगाने सुनावणी दरम्यान एफएसी (इंधन समायोजन उपकर) फंडाच्या माध्यमातून वीज कंपन्यांना फंडाचा वापर करून ग्राहकांना त्याचा फायदा देण्याचे आदेश दिले आहेत.

▪️ याप्रमाणे राज्यातील वीजग्राहकांना दिलासा देणारे निर्देश देत वीज नियामक आयोगाने 1 एप्रिलपासून वीजदर सुमारे 2 टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

▪️ मार्च 2020 मध्ये या एफएसीच्या माध्यमातून जनतेला दिलासा देण्यास सुरुवात झाली. मार्च 20 ते मार्च 21 पर्यंत सर्व रहिवासी, दुकान, कंपनी, उद्योगासाठी 10 टक्के वीजदर कमी करण्यात आले.

⚡ मुंबईकरांना असा मिळेल लाभ – या वर्षी 1 एप्रिलपासून ते या संपूर्ण वर्षासाठी टाटा, अदानी, बेस्ट आणि महावितरण यांना वीज दर कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Advertisement

🗣️ वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे म्हणाले.. विजेचे दर 2 टक्के कमी झाले आहेत का? हे तपासण्याची गरज आहे. गेल्या वर्षी 7 टक्क्यांनी विजेचे दर कमी झाले; असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र विजेचे दर 7 टक्के वाढले होते. आतासुद्धा एका विभागात कुठे तरी कमी झाले असतील. सगळ्या विभागात विजेचे दर कमी झाले आहेत का? ते तपासावे लागेल. तर शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत सरकारने ठोस निर्णय घ्यावा, असं म्हटलं आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement