अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 303 रुग्ण वाढले असून अलीकडच्या कालावधीत ही सर्वाधिक रुग्ण संख्या असून ह्यामुळे जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात आज 186 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 74 हजार 564 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.70 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 303 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 1394 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 174, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 118 आणि अँटीजेन चाचणीत 11 रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णांची संख्या
मनपा 84, अकोले 19, जामखेड 06, कर्जत 02, नगर ग्रामीण 03, नेवासा 01, पारनेर 01, पाथर्डी 09, राहुरी 05, संगमनेर 30, श्रीगोंदा 04, कॅन्टोन्मेंट बोर्ड 10 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांची संख्या
मनपा 23, अकोले 03, कर्जत 03, कोपर गाव 07, नगर ग्रामीण 08, नेवासा 07, पारनेर 02, पाथर्डी 02, राहाता 15, राहुरी 09, संगमनेर 21, शेवगाव 01, श्रीरामपूर 12 आणि इतर जिल्हा 05 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आढळून आलेल्या रुग्णांची संख्या
नगर ग्रामीण 02 पारनेर 01, राहाता 04, संगमनेर 02, शेवगाव 01, श्रीरामपूर 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
आज डिस्चार्ज मिळालेली रुग्णांची संख्या
मनपा 71, अकोले 02, जामखेड 01, कर्जत 01, कोपरगाव 03, नगर ग्रामीण 05, नेवासा 01, पारनेर 16, पाथर्डी 07, राहाता 14, राहुरी 05, संगमनेर 48, शेवगाव 02, श्रीगोंदा 02, श्रीरामपूर 04 आणि इतर जिल्हा 04 अशा रुग्णांचा समावेश आहे.
ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit