SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग! अंबानींच्या घराबाहेर आढळलेल्या गाडीचा मालक मृत्युमुखी; हत्या की आत्महत्या शंका कायम!

काही दिवसांपूर्वीच एक हदरावणारी घटना मुंबईत घडली. देशातील यशस्वी आणि प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली आणि एकच खळबळ उडाली. परंतु, ही गाडी तिथे कोणी ठेवली यासंदर्भात काही कळू शकलेले नाही.

त्यांनतर, पोलिसांना अंबानींच्या घराबाहेर पार्क करण्यात आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या मालकाची माहिती मिळाली. अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मालकाचा आता संशयास्पद मृत्यू झाला आहे.

Advertisement

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवण्यात आलेली गाडी ही चोरीची असल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं होतं. अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मूळ मालकाचे मनसुख हिरेन असं नाव आहे.

त्यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत सापडला आहे. मनसुख हिरेन काल रात्रीपासून गायब होते. कुटुंबियांनी आज दुपारी नौपाडा पोलीस ठाण्यात ते गायब असून कोठेही त्यांचा पत्ता लागत नसल्याची तक्रार दाखल केली होती.

Advertisement

याप्रकरणी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ”अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवावा अशी मागणी सभागृहात केली आहे.”

ज्या गाडीत स्फोटकं होती, त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांनी आपल्या जबाबात सांगितलं होतं की, “माझी गाडी बंद पडली. पण जेव्हा मी क्रॉफर्ड मार्केटला कामासाठी गेलो त्यावेळी ती गाडी अचानक गायब होती.”

Advertisement

“मनसुख हिरेन यांना सुरक्षा मिळायला पाहिजे ही मागणी सभागृहात काही काळापूर्वी केली होती, आणि आता त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणामध्ये एकूणच गोंधळ आहे.” असेही फडणवीस म्हणाले!

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit

Advertisement