SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ गुरूवार, 4 मार्च 2021

मेष : उत्पन्नाचे स्त्रोत मजबूत करण्यात यशस्वी व्हाल. लग्नाची चर्चा होऊ शकते. दोन पाऊले मागे येण्यास घाबरू नका. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. कामात प्रगती कराल.

Advertisement

वृषभ : तुमची काळजी आज तुम्हाला त्रास देईल. नोकरी बाबत यश मिळण्याचा दिवस आहे. मुलं आणि भावंडांचा विचार कराल. चंचलता राहील. मित्रांचा रोष वाढू शकतो. झोपेची तक्रार, कौटुंबिक समाधान असेल.

मिथुन : येण्याऱ्या काळात पैशांची परिस्थिती कशी असेल याची चिंता तुम्हाला असेल. आर्थिक गोष्टीत क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. वेळेचे योग्य नियोजन करावे लागेल. जुन्या गोष्टी काढत बसू नका.

Advertisement

कर्क : संधी मिळाली तर ती दवडू नका, कामाला सुरुवात करा. मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल. जबाबदारीने वागाल. मनात कसलीशी काळजी लागून राहील. प्रवासात काळजी घ्यावी. घरातील काही गोष्टी बदलाव्या लागतील.

सिंह : कोर्ट-कचेरीची महत्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवा. कामात हटवादीपणा येईल. महत्त्वाकांक्षा वाढेल. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. उद्दीष्ट साध्य करण्याचा प्रयत्न कराल.

Advertisement

कन्या : आनंदाचा दिवस आहे. काम करायला लोकांना आवडेल. भांडणांपासून दूर रहा. आर्थिक बाजूचा विचार करावा. जरूरी नसताना उदार होऊ नका. स्वभावात लहरीपणा राहील. वादविवाद घालू नका.

तूळ : आजचा दिवस थोडा अडचणींचा असेल. महत्वाच्या मुद्यावर भांडण होऊ शकते. घरातील गोष्टी जाणून घ्याव्यात. भावंडांशी मतभेद नको. स्वमतावर आग्रही राहाल. संघर्षाला बळी पडू नये.

Advertisement

वृश्चिक : कामकाजाच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवणे चांगले. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. घरातील समस्यांकडे अधिक लक्ष द्या. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष असू द्या. नव्या संधीची वाट पहावी.

धनु : एखाद्या बाबतीत मध्यस्थी करू शकता त्याने लाभ होईल. कुटुंबिय सहकार्य करतील. प्रलोभनाला बळी पडू शकता. वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे. मुलांची चिंता लागून राहील. पैज जिंकण्याची इच्छा बाळगाल.

Advertisement

मकर : कार्यक्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागेल. लोकांचा सल्ला उपयोगी पडेल. लहान मुलांमध्ये रमून जाल. मित्र जोडले जातील. सरकारी कामात वेळ जाईल. कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे.

कुंभ : लोकांमधील तुमची प्रतिमा चांगली असेल. तुमचे वरिष्ठ एखादी मोठी जबाबदारी तुमच्यावर सोपवू शकतात. मनातील इच्छा पूर्ण होईल. मानसिक चांचल्य जाणवेल. घरापासून दूर जावे लागेल. मनातील गैरसमज काढून टाकावेत.

Advertisement

मीन : कार्यक्षेत्राची स्थिती शांत असेल. कुटुंबिय आपापली कामे करताना दिसतील आणि तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. कामात चालढकल करू नका. हितशत्रूंवर लक्ष ठेवावे. शारीरिक उष्णता वाढेल. जनविरोधाकडे दुर्लक्ष करावे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement