SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा ‘या’ वेळेत होणार; आठवी-नववीच्या परीक्षांबाबत हा झाला निर्णय!

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिक्षण क्षेत्रावर मोठे संकट कोसळले आहे. हा काळ बोर्डाच्या परीक्षेचा आहे. त्यामुळे दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार? याबाबत संभ्रम आत्तापर्यंत पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या देखील मनात होता.

मात्र शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आता हा गोंधळ मिटवला आहे. दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा कधी होणार? आणि त्याचा पॅटर्न कसा असणार याविषयी त्यांनी मोठी घोषणा केली आहे.

Advertisement

प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा ठरलेल्या वेळेतच ऑफलाईन होणार असल्याचे सांगितले आहे. या परीक्षेच्या वेळापत्रकात किंवा पद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

आठवी नववी या वर्गाच्या परीक्षा कधी होणार असा प्रश्न विचारल्यानंतर, या प्रश्नाचे उत्तर देताना देखील त्यांनी लवकरच याबाबत निर्णय घेऊ. कारण, कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची आरोग्य सुरक्षा जास्त महत्त्वाची आहे आणि तिलाच राज्य सरकार आणि शिक्षण विभाग प्राधान्य देत आहे, असे सांगितले आहे.

Advertisement

साधारणतः मार्च मध्ये बोर्डाच्या परीक्षा सुरू होतात. मात्र पेपर सेटिंग नोव्हेंबरमध्ये सुरू झालेली असते. गाव खेड्यांपर्यंत हे पेपर जायला निदान दोन महिन्याचा कालावधी लागतो. ऑगस्ट मध्ये आम्ही सिलॅबस कमी करण्याचं काम केलं असं देखील शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

या अभूतपूर्व कालखंडामध्ये परीक्षा होणार असल्याने आता तज्ञांशी सल्लामसलत करून येणाऱ्या सूचना आणि मार्गदर्शनाचे स्वागत आहे त्याच बरोबर सर्व खबरदारी घेऊन परीक्षा घ्यावयाच्या आहेत. त्यानुसार, आता विचार सुरू असल्याचे शिक्षण मंत्र्यांनी सांगितले.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit

Advertisement