SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

धक्कादायक ! अहमदनगरमधील ‘या’ मंत्र्यांच्या मुलीच्या नावे बनावट अकाऊंट उघडून ‘केलं’ असं काही..

आजकाल डिजिटल दुनियेत काही गोष्टी या चांगल्या होतात, तर कित्येक गोष्टी या वाईट होतात. आपण वापरत असलेल्या सोशल मीडियामध्ये कधीतरी आपल्याला शंका येतेच की, हे सगळं खरंच सुरक्षित असू शकतं का ? तर याबाबतीत असाच एक प्रकार समोर आला आहे.

सोशल मीडियाचा वापर करून पैशाची मागणी करण्याचा एक धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्वाचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्या नावाने फेसबुकचे बनावट खाते तयार केल्याचे आढळले.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार…

जिल्ह्यातील महसूलमंत्र्यांच्या कन्या डॉ. जयश्री यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीने फेसबुकवर बनावट खाते उघडले.

Advertisement

या बनावट खात्याद्वारे अज्ञाताने गुगल पे, फोन पे याद्वारे पैशाची मागणी केली जात असल्याचा प्रकार समोेर आला आहे. याप्रकरणी सिद्धार्थ सुभाष थोरात यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तशी तक्रार दिली आहे.

घडलेलं सगळं प्रकरण..

Advertisement

तर 1 ते 2 मार्चमध्ये रात्री 10 वाजेच्या जवळपास या बनावट खात्याद्वारे त्या अज्ञाताने फेसबुकवरून काहींना संदेश पाठवून गुगल पे व फोन पे याद्वारे पैशाची मागणी केली.

फेसबुक पेजवर मंत्री बाळासाहेब थोरात व कन्या डॉ. जयश्री यांचा फोटो वापरण्यात आला आहे. हा प्रकार धक्कादायक असल्याचं समजल्यावर सिद्धार्थ थोरात यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.

Advertisement

गुगल पे व फोन पे द्वारे पैसे मागितल्याचे स्क्रिन शाॅट सिद्धार्थ थोरात यांनी पोलिसांकडे दिले आहेत. हे खाते लगेच बंद करुन जलद गतीने तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या प्रकरणात कोणीतरी खोडसाळपणा करुन बनावट खाते उघडून पैसे उकळण्याचे काम करत असल्याचं बोललं जात आहे. पण चक्क मोठे धाडस दाखवूनच हा पराक्रम केल्याचं दिसत आहे. यामागचं नेमकं कारण काय असू शकतं ? याचा पोलिस यंत्रणा तपास करत आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ _*ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा*_ 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement