SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

😷 कोरोना अपडेट: महाराष्ट्रात एकाच दिवशी 9,000 कोरोना रुग्ण

👥 कोरोनाचे राज्यात बुधवारी एकाच दिवशी 9,855 रुग्ण आढळून आले. ही संख्या गेल्या 4 महिन्यामधील सर्वाधिक आहे. सध्या राज्यात कोरोनाचे एकूण 21 लाख 79 हजार 185 रुग्ण आहेत.

😳 गेल्या 4 महिन्यातील सर्वोच्च वाढ –

Advertisement

▪️ बुधवारी राज्यात कोरोनामुळे 42 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं पहायला मिळालंय. त्यामुळे राज्यातील कोरोनामुळे झालेल्या एकूण मृतांची संख्या आता 52,280 इतकी झाली.

▪️ राज्यात आता कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 20 लाख 43 हजार 349 इतकी झाली आहे. सध्या राज्यात 82,343 कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Advertisement

▪️ बुधवारी मुंबईमध्ये कोरोनाचे 1,121 रुग्ण समोर आले आहेत तर 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या आता 3,28,742 इतकी झाली आहे.

▪️ राज्यातील कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारही धडपड करत आहेत. सरकारनं जास्तीत जास्त कोरोना टेस्ट करण्याच्या आणि लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत.

Advertisement

📍 कोरोनाप्रभावित जिल्ह्यांमध्ये आरटी-पीआर आणि रॅपिड अँटिजेन दोन्ही टेस्ट कराव्यात. लक्षणं असलेल्या ज्या रुग्णांची अँटिजेन टेस्ट निगेटिव्ह आली आहे, त्यांची आरटी-पीसीआर टेस्ट करावी, असं सांगितलं आहे. तसंच आता 24 तास लसीकरण होणार आहे, जेणेकरून लोकांना त्यांच्या सोयीनुसार लस घेता येईल आणि जास्तीत जास्त लोकांना लस मिळेल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement