SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अंबानी यांच्या घरातील कचऱ्याचं नेमकं काय होतं; जाणून घ्या, तुम्हालाही आश्चर्य वाटेल

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर पहिले नाव येते ते म्हणजे मुकेश अंबानी यांचे. अंबानी कुटुंबाविषयी लोकांमध्ये कायम चर्चा चालू असतात. उद्योग क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या अंबानींच्या रिलायन्स पेट्रोलियम, जिओ नेटवर्क या कंपन्यांनी अफाट यश मिळवले.

त्यांचं मुंबई येथील ‘एंटीलिया’ हे आलिशान घर, त्यांच्या नामांकित कंपन्यांच्या गाड्या, त्यांच्या घरातील लग्न समारंभ, हे त्यांच्या जीवनाचे भाग आहेतच. परंतु, त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी लोकांच्या चर्चेचा देखील भाग आहेत. लोकांना अंबानी यांच्या कुटुंबाविषयी कायमच कुतूहल असलेले दिसून येते.

Advertisement

अंबानी यांच्या घरी दूध कुठून येत असेल, जेवण बनवायला कोण असेल, त्यांचे घर कसे असेल, यांसारख्या अनेक गोष्टी जाणून घेण्याची लोकांची उत्सुकता असते. तर आपण आज अंबानी यांच्या घरातील अशीच एक गोष्ट जाणून घेणार आहोत. ती म्हणजे अंबानी यांच्या घरातील कचरा कुठे जातो.?

मुकेश अंबानी यांचे घर भारतातले सगळ्यात मोठे घर म्हणून ओळखले जाते. अंबानी यांचं घर २७ मजल्याचं असून त्या घरामध्ये ६०० नोकर कामाला आहेत. जे त्यांच्या घरातील स्वच्छता करतात, घराची सर्वप्रकारे काळजी घेतात. घरातल्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष दिले जाते. घरातली प्रत्येक गोष्ट चांगली कशी दिसेल? याची पूर्ण जबाबदारी घरातल्या नोकरांवर असते.

Advertisement

सध्या सोशल मीडियावर या गोष्टीची खूप जोरदार चर्चा चालू आहे. ती म्हणजे अंबानी यांच्या घरातील कचरा कुठे जातो? तो कशासाठी उपयोगी पडतो? त्यापासून काय निर्माण होते? काय आहे त्या कचऱ्या मागचं रहस्य ?
ते रहस्य ऐकल्यावर तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

अंबानी यांच्या घरातील कचऱ्यापासून वीजनिर्मिती केली जाते. ती निर्माण झालेली वीज त्यांच्याच घरासाठी उपयोगी पडते. पण हे सगळं खरं असलं तरी एक प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाही तो म्हणजे
वीज कशी निर्माण केली जाते?

Advertisement

अंबानी यांच्या घरातील कचरा फेकून न देता तो वीज निर्मितीसाठी वापरला जातो. त्यांच्या घरामध्ये एक विशिष्ट सिस्टिम बनवली गेली आहे. ती सिस्टिम कचऱ्यापासून वीज निर्मिती करते. सगळ्यात आधी ओला आणि सुका कचरा वेगळा केला जातो आणि नंतरच त्यापासून वीजनिर्मिती केली जाते.

अंबानींच्या एवढ्या आलिशान घरामध्ये सगळ्यात जास्त विजेचा वापर केला जातो. त्यामुळे ती वीज बनवण्यासाठी या कचऱ्याचा उपयोग केला गेला आहे. साहजिकच अंबानी यांच्यातील उद्योजकतेचे दर्शन त्यांच्या या टाकाऊपासून टिकाऊ बनवण्याच्या स्वभावात दिसून येते. मोठी माणसं टाकाऊ गोष्टीतही मूल्य शोधतात आणि अजून मोठी होतात.

Advertisement