SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या…

🗓️ बुधवार, 3 मार्च 2021

मेष : आपले धैर्य वाढवणाऱ्या घटना घडतील. आर्थिक उलाढाली कमी प्रमाणात होतील. आज आपल्या चंचल व उतावीळ स्वभावामुळे स्वतःचे नुकसान करुन घेवू नका. महत्त्वाचे निर्णय राखून ठेवाल.

Advertisement

वृषभ : आलेल्या आप्तस्वकियांकडून नाना प्रकारचे फायदे होतील.आपल्या व्यवसायातील कामामुळे आपले कार्यक्षेत्र चांगल्या पद्धतीने वाढेल. नव्या आशेने कामाला लागाल. उद्योग-धंद्यातून कामगारांचे प्रश्न सोडवण्याचा निश्चित प्रयत्न असेल.

मिथुन : आज आपल्याला मानसिक स्थैर्यतेची गरज आहे. मौजेच्या वस्तू आज खरेदी कराल. मित्र मैत्रिणींचा सल्ला क्वचितच घ्या. आपले मनोधैर्य वेळेस खचण्याचा संभव आहे. कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका.

Advertisement

कर्क : आज आपण धडाडीने महत्वाचे निर्णय घ्याल. त्या निर्णयांचा फायदा आपले व्यावसायिक कार्यक्षेत्र वाढण्यास होईल. हुशारीच्या बोलण्यामुळे सामाजिक कार्यात महत्वाचे स्थान प्राप्त होईल. आपल्या कामात नातेवाईकांना सहभागी करून घेणे शक्य असेल तर जरूर करा. नव्या कामाचा प्रस्ताव येईल.

सिंह : नोकरी-व्यवसायात कामाची जबाबदारी जरा जास्तच घ्यावी लागेल. नवीन गृहोपोयोगी वस्तू खरेदी करण्याची इच्छा होईल. मन शांत राहिल्याने त्याचा व्यवसायावर चांगला परिणाम होईल, हे आज लक्षात असुद्या.

Advertisement

कन्या : मित्रपरिवारावर अजिबात महत्वाचे काम सोपवू नका. महत्वाची कामे करणे आज शक्यतो टाळा. नोकरीत एखादी सवलत हवी असल्यास ती आज मिळेल. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. उंची वस्त्रालंकांरांची खरेदी कराल.

तूळ : व्यवसाय करणाऱ्यांसाठी दिवस व्यापारवाढीस चांगला आहे. नोकरीतील आपल्या चांगल्या कामामुळे सन्मान वाढेल. वैवाहिक सौख्य लाभेल. स्त्रिया स्वतःच्या पद्धतीने घर सजवतील. आपले आवडत्या छंदाना वेळ द्या.

Advertisement

वृश्चिक : नोकरी-व्यवसायात कामाचा ताण जाणवेल, पण भविष्यात निश्चित फायदा होईल. आजचा दिवस भाग्यवृद्धीसाठी अनुकूल आहे. पूर्ववैमनस्यातून झालेले मतभेद आज तोंडात साखर ठेवून नाहिसे कराल. अंदाज अचूक ठरतील.

धनू : शैक्षणिक वाटचालीसाठी आजचा दिवस आपल्याला उत्तम आहे. आरोग्याच्या तक्रारी काही राहतील. उष्णतेचे विकार जाणवतील. संतती संबंधी सुवार्ता कानी येतील. नवीन व्यवसायासाठी भांडवल उभे करण्यासाठी धडपड करा.

Advertisement

मकर : आपल्या घरी आज पाहुणे येतील. शैक्षणिक उत्कर्षाच्या दृष्टीने अनुकूल दिवस आहे. शिक्षण घेतलं तर प्रगती चांगली होईल. संततीसौख्य लाभेल. यशस्वी होण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. स्वतःचे प्रयत्न स्वतःच करावेत.

कुंभ : अचानक गाठीभेटी होतील. कामानिमित्त छोटे-मोठे प्रवास करावे लागतील. नोकरीत बढती-बदलीचे योग संभवतात. खर्चाला खूप वाटा मिळतील. चैनीखातर खर्च वाढता राहणार आहे. फिरायला जाण्याचे बेत आखले जातील.

Advertisement

मीन : आपले महत्वाचे फोन येतील. पूर्वी केलेल्या चांगल्या कामाची पोच मिळेल. आज आपल्या संतती संबंधी सुवार्ता समजेल. पूर्ण चौकशी केल्याशिवाय कोणताही निर्णय घेवू नये. काही वैचित्र्य कळण्याची शक्यता आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement