SpreadIt News | Digital Newspaper

💁🏻‍♂️ फक्त 51 रुपयांच्या रिचार्जवर ‘ही’ कंपनी देणार हेल्थ इन्शुरन्सचा फायदा

0

📶 वोडाफोन-आयडियाने (Vi) आपल्या 2 खास प्रीपेड प्लान्ससोबत युजर्संना हेल्थ इन्शुरन्स देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने यासाठी आदित्य बिरला हेल्थ इन्शुरन्ससोबत पार्टनरशीप केली आहे.

📱 Vi Hospicare अंतर्गत 51 रुपये आणि 301 रुपयांच्या प्रीपेड प्लान्स सोबत फ्री हेल्थ इन्शुरन्सच्या सुविधेचा लाभ मिळणार आहे.

Advertisement

🧐 जाणून घ्या फायदा –

▪️ 51 रुपयांच्या प्लान संबंधी – युजर्संना 500 फ्री एसएमएस 28 दिवसांच्या वैधतेसोबत येतात. या प्लानसोबत कंपनी हॉस्पिटल ट्रिटमेंट वर एक दिवसांसाठी 1 हजार रुपयापर्यंत आणि ही रक्कम आयसीयूसाठी डबल म्हणजेच 2 हजार रुपये प्रतिदिन होते. एका रिचार्जवर जास्तीत जास्त 10 दिवसांपर्यंत कंपनीकडून पैसे मिळू शकतात.

Advertisement

▪️ आता 301 रुपयांच्या प्लानमध्ये – रोज 1.5 जीबी डेटा, अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि रोज 100 एसएमएसची सुविधा दिली जाते. हा प्लान सुद्धा 28 दिवसांच्या वैधतेसोबत येतो. तसेच या प्लान सोबत रेग्युलर हॉस्पिटल ट्रिटमेंट वर रोज 1000 रुपयांपर्यंत तर आयसीयूमध्ये भर्ती झाल्यानंतर ही लिमिट वाढून रोज 2 हजार रुपयांपर्यंत होते.

🤷‍♂️ कोणाला मिळणार प्लानचा फायदा : तुमच्या डोक्यात हा प्रश्न आला असेल की या प्लानचा फायदा नेमका कुणाला होणार आहे. कंपनी सर्व वयोगटातील व्यक्तींना या प्लानचा फायदे देत आहे का. हो, कंपनीने सांगितले की, 18 ते 55 वर्षापर्यंतच्या व्यक्तींना याचा लाभ मिळू शकतो. परंतु, ते कोणत्याही गंभीर आजाराने त्रस्त असता कामा नये.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement