SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

💉 कोरोना लस घेताय? मग या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी सविस्तर वाचा

देशामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले आहे. आता या लसीकरणाचा तिसरा टप्पा आहे. या टप्प्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या नागरिकांसाठी नोंदणी सुरू झाली आहे. आज आपण जाणून घेणार आहोत कोणती लस कोणासाठी उपयुक्त आहे? कोव्हॅक्सीन आणि कोव्हीशिल्ड या दोन लसी पैकी, कोणती लस कोणी घेऊ नये? हे लसीकरण झाल्यानंतर होणारे दुष्परिणाम आणि त्यावर करायचे उपाय!

कोव्हॅक्सीन या लोकांनी घेऊ नये

Advertisement

◼️एलर्जी, ताप, आणि रक्ताशी संबंधित आजार असणाऱ्यांनी त्याचबरोबर रक्ताची घनता कमी असणाऱ्यांनी

◼️ रोगप्रतिकारक शक्ती वर प्रभाव टाकणारी कोणतीही औषधे सुरू असणारी व्यक्ती

Advertisement

◼️ गरोदर महिला, स्तनपान करणाऱ्या माता, किंवा नुकतीच इतर कोणतीही लस घेतलेली महिला

◼️ लसीकरण केंद्रावर आरोग्य अधिकाऱ्यांनी पडताळणीनंतर लस न घेण्याचा सल्ला दिलेली व्यक्ती

Advertisement

कोव्हॅक्सीनचे साईड इफेक्ट्स

◼️ लस दिलेल्या ठिकाणी दुखणे सूज येणे, लाल रंगाचा डाग पडणे, दंड ठणकणे, इंजेक्शन लावण्यात आलेला हात अशक्त वाटणे, अंगदुखी, डोकेदुखी, ताप, अस्वस्थ वाटणे, अशक्तपणा, आणि उलट्या ही लसीची सौम्य दुष्परिणाम आहेत.

Advertisement

◼️ गंभीर परिणामांमध्ये श्वास घेण्यास त्रास होणे, चेहऱ्यावर सूज येणे, हृदयाची धडधड अचानक वाढणे, होणे चक्कर येणे आणि अशक्तपणा जाणवू लागणे ही लक्षणे आहेत

कोव्हीशिल्ड कोणी घेऊ नये?

Advertisement

◼️ कोणत्याही औषधाने, अन्नपदार्थ, किंवा लसीमुळे ऍलर्जीचा गंभीर त्रास होतो अशा लोकांनी

◼️ वारंवार ताप येण्याची समस्या असणारे लोक, त्याचबरोबर रक्तात ताप उतरण्याची समस्या असणारे लोक, आणि रक्त पातळ असण्याची समस्या असणारे लोक

Advertisement

◼️ रोग प्रतिकार शक्तीवर परिणाम होणारी औषधे घेणारे लोक

◼️ गर्भवती महिला किंवा गर्भधारणा करण्यासंदर्भात विचार करत असलेल्या महिला

Advertisement

◼️ स्तनपान करणाऱ्या माता

◼️ कोरोनाची दुसरी लस घेतलेले लोक

Advertisement

◼️ज्या व्यक्तींना कोव्हीशिल्ड च्या पहिल्या डोसमुळे ऍलर्जीचा त्रास झाला त्यांनी पुढचा डोस घेऊ नये

हे आहेत कोव्हीशीलडचे साईड इफेक्ट्स

Advertisement

◼️ सर्वसामान्य साईड इफेक्ट मध्ये अंगदुखी, ताप, लस घेतलेल्या ठिकाणी सूज किंवा खाज येणे, त्वचा लाल होणे इत्यादीचा समावेश आहे

◼️ लस घेणार्‍यांना अनेकदा अशक्तपणा, थकवा किंवा थंडी वाजणे, ताप येणे, डोकेदुखी, आजारी असल्यासारखे वाटणे, सांधेदुखी आणि स्नायू दुखणे यासारखा त्रास होऊ शकतो

Advertisement

◼️ इंजेक्शन घेतलेल्या ठिकाणी गाठ आल्यासारखे सुजणे, ताप, उलटी आणि फ्लू सारखी लक्षणे काहीजणांना दिसतात.

◼️वाहते नाक किंवा घसा खवखवणे, खोकला, थंडी यासारखी लक्षणे देखील आढळून येतात.

Advertisement

◼️ चक्कर येणे, कमी भूक लागणे, पोटात दुखणे, जास्त घाम येणे, सतत खाज येणे, ही लक्षणे गंभीर साईड-इफेक्ट निर्देशित करतात

काय कराल?

Advertisement

◼️ अनेकदा गंभीर लक्षणे दिसून आली तर व्यक्ती घाबरून जातो. तसे न करता, अंगदुखी किंवा अस्वस्थ वाटत असेल तर, संबंधित व्यक्तीने तात्काळ त्याच्या कौटुंबिक डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

◼️सल्ला न घेता औषधे घेणे हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. कोणतीही पेन किलर घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अशा स्थितीमध्ये जरूर घ्यावा.

Advertisement

◼️लस घेण्याआधी अशा कोणत्याही प्रकारच्या गोळ्या घेऊ नये, ज्यामध्ये आयबुप्रोफेन किंवा ऍस्पिरिन, अँटीथीस्टेमाइस किंवा सारखे कंटेंट असतील. याने देखील गंभीर स्वरूपाचे साईड इफेक्ट होऊ शकतात.

(सदर माहिती हि प्राथमिक असून, सविस्तर माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit

Advertisement