SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फायदे कि बात: किसान क्रेडिट कार्ड अजूनही मिळाले नसेल तर, 31 मार्च च्या आधी करा ‘ही’ प्रक्रिया!

💁🏻‍♀️ किसान क्रेडिट कार्ड हे शेतकऱ्यांसाठी काढलेले मोदी सरकारकडून वरदानच आहे असे म्हणावे लागेल. या क्रेडिट कार्ड द्वारे शेतकरी तीन लाखांपर्यंत कर्ज केवळ 7 टक्के व्याजाने घेऊ शकते.

📌 हे क्रेडिट कार्ड तुम्ही कोणत्याही राष्ट्रीयकृत किंवा ग्रामीण बँकेतून मिळवू शकता. जर तुम्ही शेतकरी असाल तर, pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही किसान क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करू शकता.

Advertisement

ℹ️ जर ऑफलाइन पद्धतीने किसान क्रेडिट कार्ड मिळवायचे असेल तर, कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ इंडिया सारख्या बँकेत जाऊन तुम्ही किसान क्रेडिट कार्ड साठी फॉर्म भरू शकता.

▶️ ज्या शेतकऱ्याने हे किसान क्रेडिट कार्ड घेतले आहे, त्याला 3 लाखांपर्यंत कर्ज मिळते. तेही 7% दरामध्ये! जो शेतकरी हे कर्ज वेळेवर फेडतो त्याला 3 टक्के व्याज दरात सुट देखील मिळते. म्हणजे त्या शेतकऱ्याला केवळ 4 टक्के व्याजाने कर्ज परत करावे लागते.

Advertisement

👌 हे कार्ड मिळवण्यासाठी ऑफलाइन किंवा ऑनलाईन फॉर्म भरताना सुद्धा आयडेंटिटी प्रूफ द्यावे लागतात. जसे की, आधार कार्ड किंवा वोटर आयडी कार्ड त्या व्यक्तीची पूर्ण माहिती, शेतकरी असल्याचा पुरावा, आणि कोणती पिके घेतली आहेत याची सविस्तर माहिती बँकेला द्यावी लागते. रहिवासी प्रमाणपत्राची कोणत्याही आयडी प्रूफ चे बँकेकडे पुरावे दिल्याने पूर्तता होते.

👉 इतर कोणत्याही बँकेचे क्रेडिट कार्ड तुमच्याकडे नाही याची खात्री करूनच किसान क्रेडिट कार्ड तुम्हाला मिळते.

Advertisement

🎯 हे मिळतील फायदे

◼️ किसान क्रेडिट कार्ड च्या खात्यात कर्जावर बचत खात्याच्या दराने व्याज मिळते.

Advertisement

◼️ किसान क्रेडिट कार्ड धारकाला बँकेकडून मोफत एटीएम कार्ड सहित डेबिट कार्डही दिले जाते.

◼️ भारतीय स्टेट बँकेकडून शेतकऱ्यांच्या नावाने एटीएम आणि डेबिट कार्ड दिले जाते.

Advertisement

◼️जो शेतकरी वेळेच्या आधी कर्ज फेडून टाकतो त्याला तीन टक्के व्याजावर अतिरिक्त सूटही मिळते.

◼️ तीन लाखापर्यंत कर्जासाठी दर महिन्याला दोन टक्के प्रत्येक वर्षी या दराप्रमाणे व्याजात सूट मिळते.

Advertisement

◼️ या खर्चावर पिक विम्याचे कव्हरेज देखील दिले जाते.

◼️ पहिल्या वर्षीचे व्याज ठरवताना कर्ज किती घेतले आहे त्याच बरोबर शेतकऱ्यांनी किती पैसा गुंतवला आहे आणि पीक आल्यानंतर झालेला खर्च आणि जमिनीची लागत याच्या आधारावर गोष्टी ठरवल्या जातात.

Advertisement

▶️ या लोकांना होणार लाभ!

◼️ मत्स्य पालन करणारे लोक त्याचबरोबर पशुपालन करणारे लोक यांना दोन लाखांपर्यंत कर्ज मिळते दुसऱ्याच्या शेतीवर काम करणारा व्यक्ती जो मत्स्यपालन किंवा पशुपालन करतो तो देखील याचा लाभ घेऊ शकतो.

Advertisement

◼️यासाठी असणारी वयोमर्यादा 18 वर्ष ते 75 वर्षापर्यंत आहे जर शेतकऱ्याचे वय 60 वर्षापेक्षा जास्त असेल तर, त्याच्या सोबत आणखी एक co-applicant देखील लागतो.

◼️ तुम्ही फॉर्म भरल्यानंतर बँकेचा कर्मचारी सर्व अटींची पूर्तता होते की नाही आणि तुम्ही या क्रेडिट कार्ड साठी पात्र आहात की नाही याची शक्यता पडताळून पाहतो आणि नंतर यावर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड दिले जाते.

Advertisement

◼️ सर्व अटींची पूर्तता करून देखील तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड मिळाले नाही तर तुम्हीच या बँकेच्या अधिकाऱ्याला याविषयी तक्रार देऊ शकता 15 दिवसाच्या आत तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड मिळायला हवे. मात्र या अवधीमध्ये तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड मिळाले नाही तर तुम्ही तक्रारदार म्हणून तक्रार करू शकता.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/Spreadit

Advertisement