खुशखबर: आता तुमचं घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण.. या 10 बँका देताय स्वस्तात गृहकर्ज..
देशातील या 10 बँका मिळवून देतील सर्वात स्वस्त दरात गृहकर्ज; जाणून घ्या बँकेचे नाव आणि मिळवा तुमच्या स्वप्नातले घर!
तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल तर, गृहकर्ज ही गोष्ट आपसूकच आपल्या डोक्यात सतत घोळत असते. प्रत्येकजण अशा बँकेच्या शोधत असतो ज्या बँकेचा व्याजदर सर्वात कमी असेल. आज आपण अशाच दहा बँकांची यादी जाणून घेऊ, ज्या बँका देशातील सर्वात कमी व्याजदर देण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
स्वस्तात गृहकर्ज उपलब्ध करून देणाऱ्या बँकची यादी:
आयसीआयसीआय बँक: सर्वात स्वस्त गृह कर्ज देणाऱ्या बँकांच्या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे आयसीआयसीआय बँक ज्या बँकेकडून तुम्ही 6.9 टक्क्याने गृहकर्ज उपलब्ध करून घेऊ शकता.
ऍक्सेस बँक: 6.9 याच व्याजदराने ऍक्सेस बँक ही तुम्हाला गृहकर्ज उपलब्ध करून देते ही बँक या यादीत नवव्या क्रमांकावर आहे.
बँक ऑफ इंडिया: आठव्या क्रमांकावर असणारी बँक आहे बँक ऑफ इंडिया जी बँक 6.85 टक्क्याने गृहकर्ज देते.
बँक ऑफ बडोदा कडून देखील याच टक्केवारीने गृहकर्ज उपलब्ध करून घेऊन, तुम्ही तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण करू शकता. ही बँक या यादीत सातव्या स्थानी आहे.
पंजाब नॅशनल बँक सहाव्या स्थानी असून गृह कर्ज देण्यासाठी त्यांची व्याजदराची टक्केवारी 6.80 टक्के आहे.
युनियन बँक : गृहकर्जाच्या याच व्याजदरातून युनियन बँक देखील गृहकर्ज उपलब्ध करून देते. ही बँक या यादीमध्ये पाचव्या स्थानावर आहे.
एचडीएफसी बँक: खाजगी क्षेत्रात असणारी एचडीएफसी बँक देखील 6.80 टक्केवारी देत गृहकर्ज देते आणि बँकांच्या यादीमध्ये चौथ्या स्थानावर ही बँक आहे.
सिटी बँकेचा नंबर या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर लागतो. व्याज दर 6.75 टक्के देत गृहकर्ज ग्राहकांना देण्यासाठी ही बँक प्रसिद्ध आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेने सिबिल स्कोर च्या आधारावर हकर्जावर 70 बेसिक पॉईंट म्हणजे 0.7 टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे या यादीमध्ये एसबीआय या बँकेचा दुसरा क्रमांक लागतो. या बँकेने आपल्या गृहकर्जावरील व्याजदर 6.70 टक्के एवढा खाली आणला आहे. त्याचबरोबर पूर्ण प्रोसेसिंग फी देखील 31 मार्चपर्यंत माफ करण्यात आल्याचे बँक सांगते.
कोटक महिंद्रा बँक देखील गृह कर्ज देणाऱ्या कोणत्याही बँकेत पेक्षा व्याजदर कमी असल्याचा दावा बँकेकडून केला जातो. 1 मार्चपासून गृहकर्जावरील व्याजदर देखील त्यांनी कमी केला आहे. ही कपात इतकी झाली आहे की, बँकेने सर्वात स्वस्त गृह कर्ज देणाऱ्या बँकेची या यादीत पहिले स्थान पटकावला आहे. या बँकेकडून 6.65 टक्क्यांनी गृहकर्ज ग्राहकांना उपलब्ध करून दिले जाते.
चला तर मग तुमच्या आवडीची बँक निवड आणि होमलोन घेऊन तुमचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करा
पडीक व नापीक जमिन असली तरीही सरकार देणार 30,000 रुपये..
Advertisementकसे ते एकदा वाचाच: https://cutt.ly/ilNvdyv
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन 🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/Spreadit