SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या…

🗓️ सोमवार, 1 मार्च 2021

▪️ मेष : आनंदी वृत्तीचा वावर राहील. बौद्धिक तरलता दिसून येईल. अभ्यासूपूर्ण निर्णय घ्याल. आजचा दिवस प्रवासास अनुकूल आहे. व्यावसायिक कामे काळजीपूर्वक करावीत. प्रत्येक काम जबाबदारीने पार पाडा.

Advertisement

▪️ वृषभ : आजचा दिवस हसतखेळत घालवाल. तुमच्या जुन्या इच्छा पूर्ण होतील. कमिशनच्या कामात लक्ष घालाल. नोकरीत बढतीचे योग संभवतात. कौटुंबिक कलह नको. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत आल्यामुळे समाधान लाभेल.

▪️ मिथुन : जवळचा प्रवास सुखकारक होईल. उगाच नसत्या गोष्टी उकरून काढू नका किंवा उचापत्या करू नका. मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्याल. उत्कर्षाच्या दृष्टीने आजचा दिवस आपल्यासाठी अनुकूल आहे. जोडधंद्यातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल.

Advertisement

▪️ कर्क : कौटुंबिक गरजा पूर्ण कराल. हातातील कामाकडे लक्ष द्यावे. अचानक झालेले कौटूंबिक बदल स्वीकारावेत. भावंडांना मदत करावी. ज्या लोकांमुळे तुम्ही अडचणीत येता, अशा लोकांपासून लांब रहा.

▪️ सिंह : दिवस मनाजोगा व्यतीत कराल. आवडणाऱ्या गोष्टी, छंद करण्याकडे लक्ष द्यावे. तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात सफलता लाभेल. प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीचा प्रत्यय येईल.

Advertisement

▪️ कन्या : गुंतलेल्या मन:स्थितीतून बाहेर यावे. मैत्रीचे, प्रेमाचे संबंध अधिक घट्ट होतील. उधार उसनवारीचे व्यवहार टाळावेत. मनातील गैरसमज बाजूस सारावेत. धार्मिक शुभ समारंभात सतत सहभाग घ्यायला मिळेल.

▪️ तूळ : दिवस आळसात घालवाल. मनात मोठमोठ्या कल्पना रचल्या जातील. भावंडांशी मतभेद प्रसंगी वाद संभवतील. नशिबाला साथ मिळेल. नोकरीत वरिष्ठांना मान देऊन आपली कामे करा. अचानक धनलाभाचा योग आहे.

Advertisement

▪️ वृश्चिक : राजकीय संबंध वाढेल. घरासाठी नवीन शोभेच्या वस्तू खरेदी केल्या जातील. कामाच्या ठिकाणी मान वाढेल. पराक्रमाला वाव मिळेल. लेखक, साहित्यिक, कवी, कलाकार यांना चांगल्या संधी लाभतील.

▪️ धनु : आपण घेतलेले निर्णय अचूक ठरतील. धार्मिक कार्यात सहभाग नोंदवाल. धर्मादाय संस्थेस मदत कराल. कलेस चांगला वाव मिळेल. प्रतिस्पर्ध्याची चाल पाहूनच पुढे वाटचाल करावी. तुम्हाला कोणीही आव्हान देण्याचा प्रयत्न करेल.

Advertisement

▪️ मकर : कामे वेळेत पूर्ण करण्यास भर द्या. धार्मिक ग्रंथांचे वाचन करण्यास घराबाहेर पडाल. चिकाटी सोडून चालणार नाही. पत्नीचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. हितशत्रूंच्या कारवायांना मोठ्य़ा युक्तीवादाने सामोरं जावं लागेल.

▪️ कुंभ : जोडीदाराच्या सहकार्याने कामे पार पडतील. मौल्यवान व गरजेच्या वस्तू खरेदी केल्या जातील. कामात चंचलता आणू नका, घाई नको. व्यावसायिक कामानिमित्त प्रवासयोग घडतील. पाहुण्यांमुळे आपल्या जीवनात खूप दिवसांनी आनंद येईल.

Advertisement

▪️ मीन : आपल्या व्यक्तींच्या आनंदात आनंद मानाल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. आज मोठ्या व्यक्तींचा सल्ला उपयोगी पडेल. संध्याकाळी प्रवास होईल. स्पर्धात्मक परीक्षांसाठी भरपूर मेहनत घ्यावी लागेल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit

Advertisement