SpreadIt News | Digital Newspaper

दिवसभरातील घडामोडींचा झटपट आढावा!

0

🧐 धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची पंकजा ताईंकडून मागणी!

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर संजय राठोड यांच्या राजीनाम्याविषयी बोलताना, पत्रकाराने धनंजय मुंडे यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना असंविधानिक गोष्टीला पाठिंबा नसल्याची कबुली, स्वतः त्यांनीच राजीनामा द्यावा ही पक्षाची आणि आपली मागणी असल्याची कबुली!

Advertisement

💰 मोदी सरकारला सलग पाचव्या महिन्यात मिळाले जीएसटीतून 1 लाख कोटी!

सलग पाचव्या महिन्यात 1 लाख कोटींहून अधिक केंद्र सरकारची मिळकत जीएसटीच्या माध्यमातून. अर्थमंत्रालयानं जाहीर केलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यात जीएसटीतून मिळालेले उत्पन्न तब्बल 1.13 लाख कोटी.

Advertisement

📚 10 वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी विषयनिहाय शंका समाधान कार्यक्रमाचे आयोजन!

इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विषयनिहाय शंका समाधान कार्यक्रमाचे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र तर्फे आयोजन करण्यात येणार; जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे शिक्षण मंत्र्यांचे आवाहन!

Advertisement

😷 जगभरातील ‘इतक्या’ लोकांमध्ये कोरोना अँटीबॉडीज!

WHO कडून कोरोना विरोधात अँटीबॉडीज तयार झालेल्या लोकांची टक्केवारी जाहीर, 10 टक्क्यांपेक्षा कमी लोकांच्या शरीरात कोरोना विरुद्ध लढण्यासाठी अँटिबॉडीज.

Advertisement

📊 शेअर बाजारातील तांत्रिक बिघाडामुळे डिजिटल यंत्रणांना धडा!

गेल्या आठवड्यात शेअर बाजाराचे कामकाज तांत्रिक बिघाडामुळे 4 तास बंद ठेवावे लागल्यानंतर, यापासून डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणांनी धडा घ्यावा, निर्मला सीतारामन यांची सूचना

Advertisement

📞 देशात 1 मार्चपासून टेलिकॉम स्पेक्ट्रम लिलावाला सुरूवात!

देशात 1 मार्चपासून टेलिकॉम स्पेक्ट्रम लिलावाला सुरूवात झाली आहे. 6 वर्षात 2 वेळा केंद्र सरकारने अशा प्रकारचा लिलाव केला आहे.

Advertisement

🧐 पुणे शहरात 24 तासात 406 नवीन कोरोना रुग्ण तर 6 जणांनी गमावला जीव!

पुणे शहरात गेल्या 24 तासात 406 नवीन रुग्ण आढळून आले आहेत, आणि 6 जणांनी जीव गमावला आहे. तर 415 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Advertisement

या बातम्या नक्की स्प्रेड करा!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/Spreadit

Advertisement