गुजरातमधील अहमदाबाद येथे असलेले सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम म्हणजेच मोटेरा स्टेडियम हे जगातले सर्वात मोठे स्टेडियम म्हणून ओळखले जाते. काही दिवसांपूर्वीच या स्टेडियमच्या नावात बदल करण्यात आला आहे. भारत सरकारच्या निर्णयानुसार आता या स्टेडिअमचे नाव ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ असे असणार आहे. स्टेडियमच्या या नामकरणानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर भरपूर प्रमाणात टीका केली. पण शेवटी हा सरकारचा निर्णय आहे. त्याचे विश्लेषण न करता आपण या स्टेडिअमची काही वैशिष्ट्ये पाहूयात.
चौफेर पाहू शकतो : या स्टेडियमची सर्वात महत्त्वाची खासियत म्हणजे या स्टेडियममध्ये कुठेही बसले तरी मैदानाची प्रत्येक बाजू स्पष्ट दिसते. समजा क्रिकेटपटूने कोणत्याही कोपऱ्यामध्ये षटकार किंवा चौकार मारला तो मैदानामध्ये कोणत्याही कोपऱ्यात बसलेल्या प्रेक्षकांना सहजपणे पाहता येऊ शकतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या मैदानामध्ये कोणताही उभा पिलर किंवा खांब रोवलेला नसल्यामुळे हे शक्य होते.
एलइडी लाईट आणि पीच : जगात पहिल्यांदाच स्टेडिअमसाठी एलईडी लाईटचा वापर हा नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झाला आहे. यामुळे रात्रीच्या अंधारात देखील एलईडीच्या प्रकाशामुळे खेळपट्टीवर चित्र एकदम स्पष्ट दिसते. स्टेडियममध्ये विविध प्रकारची 11 पीच आहेत. यामध्ये 5 लाल मातीपासून बनवलेली असून 6 काळ्या मातीपासून बनवलेले पीच आहेत.
खेळाडू आणि व्हीआयपीसाठी सोय : हे स्टेडियम फक्त दिसायलाच भव्य नसून यामध्ये सुविधादेखील मोठ्या प्रमाणावर आहेत. खासकरून खेळाडूंसाठी या ठिकाणी 4 ड्रेसिंग रूम बनवलेले आहेत. अगदी त्याचप्रमाणे व्हीआयपी गेस्टसाठी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 76 कॉर्पोरेट बॉक्स देखील बनवण्यात आले आहेत. यासाठी अंदाजे 700 कोटी रुपये खर्च केल्याचे सांगितले जाते
इतरही अनेक सुविधा : नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम असल्याने याठिकाणी सोयीसुविधांची कोणतीही कमतरता नाही. या ठिकाणी 3 प्रॅक्टिस ग्राउंड, क्लब हाऊस, ऑलिंपिक आकाराचा स्विमिंग पूल आणि एवढेच नव्हे तर एक इनडोअर क्रिकेट अकादमी देखील बनवण्यात आली आहे.
पार्किंगची व्यवस्था : ज्याअर्थी स्टेडियम भव्य आहे, त्याअर्थी तेथील आसन क्षमता जास्त आहे. त्यामुळे तेवढ्याच प्रमाणात लोक या ठिकाणी त्यांची वाहने घेऊन येणार, हा विचार करून स्टेडियममध्ये भव्य पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. या ठिकाणी जवळपास 4 हजार कार आणि 10 हजार दुचाकी वाहने पार्क करू शकतो एवढी मोठी सोय आहे.
मोटेरा स्टेडियमवर घडलेल्या काही ऐतिहासिक गोष्टी :
नरेंद्र मोदी स्टेडियमवर 24 फेब्रुवारी 2020 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना मेजवानी दिली होती. या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला संबोधितदेखील केले होते. अवघ्या जगाचे लक्ष तेव्हा ट्रम्प यांच्याकडे आणि जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमकडे होते.
या स्टेडियममध्ये क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय सामन्यात 18 हजार धावा पूर्ण करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. असे करणारा सचिन हा एकमात्र क्रिकेटपटू ठरला होता.
सुनील गावस्कर यांनी 1986-87 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या टेस्ट क्रिकेटमध्ये या ठिकाणी 10 हजार धावा पूर्ण केल्या होत्या
ऑक्टोबर 1999 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमध्ये क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आपल्या पहिल्या टेस्ट मॅचचे द्विशतक बनवले होते.
सचिनने 16 नोव्हेंबर 2009 ला श्रीलंकेचा विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वीस वर्ष पूर्ण केले होते ते देखील या स्टेडियमवरच. या सामन्यादरम्यान सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 30 हजार धावांचा विक्रम पूर्ण केला होता.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/Spreadit