SpreadIt News | Digital Newspaper

त्या मुंबईतील बत्तीगुल मागे चीनचाच हात?

0

मागील वर्षी 12 ऑक्टोबर रोजी मुंबईत झालेल्या बत्तीगुल घटनेमागे चीनचाच हात असल्याचा दावा अमेरिकेतील न्यूयॉर्क टाईम्सने केला आहे. या दाव्याला आता महाराष्ट्र सरकारमधील ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा पाठिंबा मिळाला आहे.

काय म्हणाले नितीन राऊत?

Advertisement

“जेव्हा मुंबईत बऱ्याच वेळासाठी वीज गेली, तेव्हाच मी म्हणालो होतो की काहीतरी चुकीचं घडत आहे. त्यावेळीही मी 3 सदस्यांची समिती या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमली होती. आता माध्यमांमधून जे दावे केले जात आहेत, त्यात तथ्य आहे असं मला वाटतंय. सोमवारी संध्याकाळपर्यंत यावर सायबर सेल गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर सत्य समोर येईल”

याच पार्श्‍वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील सायबर सेलला, ‘लवकरात लवकर या गोष्टीचा अहवाल सादर करा’ असे आदेश दिले आहेत. त्यामुळे, चौकशीअंती आणि अहवालाद्वारे कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/Spreadit

Advertisement