SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महानायक अमिताभ बच्चन यांच्या शास्त्रक्रियेविषयी मोठी अपडेट; निकटवर्तीयांनी केला खुलासा

महानायक हा नुसता शब्द जरी ऐकला तरी आपल्यासमोर उभे राहतात ते अभिनेते अमिताभ बच्चन. आपल्या अष्टपैलू आणि दमदार, कसदार अभिनयाने संपूर्ण बॉलीवूडवर राज्य करणारे अभिनेते म्हणजे अमिताभ बच्चन होय.

आज त्यांचे वय ऐंशीच्या घरात असले तरीदेखील त्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. आजही ते त्याच उत्साहाने चित्रपटांमध्ये काम करतात आणि आपल्या विविध भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकतात.

Advertisement

मात्र अलीकडील काळामध्ये अमिताभ यांची प्रकृती स्थिर राहत नसल्याने चाहते नेहमी काळजीत दिसतात. नुकतेच कोरोनाकाळात अमिताभ यांना कोरोनाची बाधा झाली होती. मात्र त्यांनी त्यावर देखील यशस्वीरित्या मात करून पुन्हा अभिनय करण्यास सुरुवात केली होती.

परंतु आता कालच्या रविवारी त्यांनी सोशल मीडियावरून एक फोटो शेअर करत त्यांची एक सर्जरी होणार असल्याचे कळवले होते. यावरूनच त्यांच्या चाहत्यांमध्ये घबराट पसरली होती. तसेच अनेक चाहते अमिताभ यांच्या चांगल्या आरोग्यासाठी कामना करताना दिसत होते.

Advertisement

अमिताभ यांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया होणार असल्याचे सांगितले जात होते. आता याविषयी नवीन खुलासा समोर आला आहे. आमिताभ यांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या झाली असून, आज म्हणजेच सोमवारी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

‘अमिताभ यांच्या प्रकृतीबाबत चिंतेची कोणतीही बाब नाही, त्यांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून ते चोवीस तासांमध्ये आपल्या घरी पोहोचतील’ असे अमिताभ त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितले.

Advertisement

अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये सर्जरीचा इशारा दिला तेव्हापासूनच आमिताभ यांचे चाहते अस्वस्थ झाले होते. अमिताभ यांनी ‘आपली तब्येत अलीकडे फार खराब असते, आपल्याला सर्जरीची आवश्यकता आहे’, असे म्हटले होते. यावरून आणि त्यांचे चाहते परेशान झाले होते.

मात्र आता अमिताभ यांच्या निकटवर्तीयांनी केलेल्या खुलाश्यावरून अमिताभ यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजत आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांचा काही प्रमाणात का होईना जीव भांड्यात पडला आहे.

Advertisement