भारतात दोन लशींना मान्यता दिली आहे. त्यामुळे त्याचे लसीकरण मोहिम सरकारने हाती घेतली आहे. कोरोना लसीकरणाच्या दुसर्या टप्प्यातील तयारीच्या दरम्यान केंद्र सरकारने रुग्णालयांची यादी जाहीर केली. हा दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरू होणार आहे.
कोरोना लसीकरणाला वेग देण्यासाठी या प्रक्रियेत अधिक संख्येने खासगी रुग्णालयांचा समावेश केला आहे. आयुष्मान भारत योजनेंतर्गत जवळपास 10 हजार खासगी रुग्णालये आणि 600 सीजीएचएस रुग्णालये केंद्र बनविली गेली आहेत.
शासनाने आयुष्मान भारत योजनेंतर्गत पॅनेलमध्ये समाविष्ट केलेल्या रुग्णालयांची यादीसाठी https://pmjay.gov.in/covid-vaccination-hospitals या संकेतस्थळावर क्लिक करा.
लसीकरणाच्या या टप्प्यात 60 वर्षांपेक्षा जास्त आणि 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोणत्याही आजार असणार्यांना 1 मार्चपासून सरकारी केंद्रांवर एंटी-कोरोना विषाणूची लस मोफत दिली जाईल. त्याचबरोबर त्यांना यासाठी खासगी दवाखाने आणि केंद्रांवर पैसे द्यावे लागतील.
ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/Spreadit