SpreadIt News | Digital Newspaper

💉 गुड न्यूज.. खाजगी रुग्णालयात ‘इतक्या’ रुपयांना मिळणार कोरोनाची लस!

0

😷 खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना लस 250 रुपये; लसीकरणाचा तिसरा टप्पा उद्यापासून

🏥 खासगी रुग्णालयांतूनही कोरोना लस देण्यात येणार असून तिच्या प्रत्येक मात्रेसाठी 250 रुपये शुल्क आकारले जाईल, तर सरकारी रुग्णालयांमध्ये लस मोफत देण्यात येईल, असे केंद्रीय आरोग्य विभागाने शनिवारी सांगितले. लसीकरणाचा तिसरा टप्पा सोमवारपासून (1 मार्च) सुरू होत आहे.

Advertisement

🤕 45 ते 59 वयोगटातील हृदयविकार, पक्षाघात, 10 वर्षांपासून मधुमेह असलेले, उच्च रक्तदाबाचे रुग्ण, डायलीसीसवरील रुग्ण, कर्करुग्ण आदी 20 प्रकारच्या रुग्णांचे लसीकरण करण्यात येईल.

💉 खासगी रुग्णालयांमध्ये प्रत्येक मात्रेसाठी जे 250 रुपये आकारले जाणार आहेत, त्यात 150 रुपये लशीचे आणि 100 रुपये सेवा शुल्क आहे. लसीकरणासाठी निवडलेल्या खासगी रुग्णालयांची यादी केंद्रीय आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

Advertisement

💁🏻‍♂️ सोमवारपासून तिसरा टप्पा सुरू होत आहे. या टप्प्यात 60 वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती आणि 45 वर्षांहून अधिक वयाच्या सहआजार रुग्णांना लस दिली जाईल. एकूण 10 हजार सरकारी सुविधा व 20 हजार खासगी रुग्णालये त्यासाठी सज्ज करण्यात आली आहेत.

📱 ‘कोविन अ‍ॅप 2.0’ ची मदत होणार-

Advertisement

▪️ नावनोंदणी करण्यासाठी ‘कोविन’ अ‍ॅपच्या नव्या आवृत्तीत ‘जीपीएस’ची सुविधा.

▪️ ‘कोविन अ‍ॅप’च्या मदतीने नावनोंदणी, लसीकरणाची वेळ निश्चित करता येईल.

Advertisement

▪️ मोबाईल नंबर नोंदवल्यानंतर त्या व्यक्तीच्या खात्याचा ‘ओटीपी’ तयार होईल.

▪️ त्याच खात्यावर कुटुंबातील इतरांची नोंदणी करता येईल.

Advertisement

▪️ परराज्यातून आलेल्या व्यक्तींना ती सध्या ज्या राज्यात आहे त्या राज्यात लस घ्यावी लागेल.

▪️ जे थेट नावनोंदणीसाठी लसीकरण केंद्रात येतील त्यांना स्वयंसेवक मदत करतील.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/Spreadit

Advertisement