SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

👬खऱ्या मैत्रीला ‘खुन्नस’चा शाप आहे.. कसा? ते जरूर वाचा

विधात्याने दिलेले सर्वात सुंदर गिफ्ट म्हणजे मैत्री आणि मित्र. परंतु, या विधात्याने जेव्हा मैत्रीची ‘कॉन्सेप्ट’ बनवली असेल ना तेव्हा नकळत कुना दुष्टाची नक्कीच नजर लागली असेल! कारण मैत्रीत नव्यान्नव गोष्टी चांगल्या करा पण एक गोष्ट चुकली ना संपलं सगळं..

कारण, मित्र म्हणजे आपला यार, सोबती, जीव कि प्राण, सखा आणि अशा मित्राला आपण हक्काने मदत मागावी आणि मित्राने हि तत्परतेने मदत करायलाच पाहिजे हा विधिलिखित नियमच जणू.. हो ना?

Advertisement

अगदी हक्काने आपण मित्राला बाईक मागतो, किंवा पैसे मागतो किंवा कुठे सोबत येणासाठी विचारतो. कित्येकदा तो लगेच तयार होतो. परंतु, हे प्रत्येकच वेळी मित्राला शक्य होईलच असं नाही आणि तिथेच मैत्रीच्या सुंदर नात्याला तडा जातो. आपल्याला जबरदस्त राग येतो आणि हा राग आपण डोक्यात घालून घेतो.

हल्ली ना आपण प्रत्येक गोष्टीत व्यक्त होतो. पण मैत्रीमध्ये जर मित्र किंवा मैत्रिणीकडून कळत-नकळत जर आपण दुखावलो गेलो, नाहीच आवडली आपल्याला एखादी गोष्ट, पार डोक्यातच गेला मित्र, तर ज्यामुळे आपण दुखावलो गेलो किंवा आपल्याला त्रास झाला, ती गोष्ट आपण लगेच काहीच बोलणार नाही. ती गोष्ट तशीच मनाच्या गाभाऱ्यात पुरून ठेवतो. पण त्याच खत होऊन मैत्रीच्या पालवीला अंकुर फुटण्यापेक्षा विषवल्लीच जन्म घेते.

Advertisement

त्यात मैत्रीत व्यवहार आला कि मित्र कधी दुष्मन होऊन बसतो आपल्यालाच कळत नाही. बर एक वेळ कट्टर दुष्मन परवडला बरका पण मित्र हा दुष्मन झाला कि कधीच परवडणार नाही. कारण त्याला आपले सर्व अंडेपिल्ले माहित असतात. आणि, तो आपल्या विरोधात गेला आणि दुष्मन झाला तरी त्याला आपण पक्क्या दुष्मनासारखं नाही ना वागवू शकत कारण सॉफ्ट कॉर्नर असतोच शेवटी.

मग मित्राचे मित्र बदलतात. आपल्याला टाळून जवळचा मित्र इतर मित्रांना जवळ करतो. आणि खरा त्रास तेव्हा होतो. कारण घासातला घास, ग्लासातला घोट, सुखदुःखाचा क्षण त्याच्या सोबत वाटलेला असतो ना मग त्याला दुसऱ्यासोबत वाटताना पाहताना जीव तुटतोच.

Advertisement

त्यामुळेच मित्रांनो जर खऱ्या मित्राचा कधी राग आला, कुठली गोष्ट खटकली, नाही विचार पटले, नाहीच मेतकूट जमलं ना अगदी तोंडावर बोला, ओरडा, रागवा, भांडाही. परंतु, डोक्यात राग घालून कधी खुन्नस नका धरू. कारण घरात जस भांड्याला भांडं लागत तसं मैत्रीत शब्दाला शब्द लागतोच मित्रांनो.
मैत्रीविना श्रीकृष्ण सुद्धा राहू शकला नाही तर तुम्ही आम्ही कोण?

👌 हा लेख तुमच्या जवळच्या मित्राला नक्की पाठवा.!

Advertisement

✍️ लेख: सुहास रायकर (फाऊंडर आणि संपादक, स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर | https://www.instagram.com/suhas_raikar)

असेच सुंदर लेख WhatsApp वर वाचण्यासाठी ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा : https://cutt.ly/Spreadit

Advertisement