SpreadIt News | Digital Newspaper

🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या…

0

🗓️ शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

▪️ मेष : आज राजकीय भूमिकेला चांगलं यश येईल. तुमचा उत्साह वाढेल. घरगुती कामासाठी प्रवास होईल. कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी आपली निवड होईल. मित्रांचे संपूर्ण सहकार्य मिळेलच असं नाही. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. अति घाई चांगली नाही.

Advertisement

▪️ वृषभ : सामाजिक भान राखावे लागणार. युवा वर्गाला आशादायक संधी मिळतील. साचेबद्ध जीवनातून विरंगुळा मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घ्या. मित्रांच्या सहवासात रमून जाल. कुटुंबाचे अधिक प्रेम मिळेल.

▪️ मिथुन : मुलांसाठी लाभदायक गोष्टी घडतील. प्रत्येक गोष्टीत आवड निर्माण होईल. आपल्याला मानसिक स्वास्थ लाभेल. आपल्या संभाषण चातुर्यामुळे वरिष्ठांना जिंकून घ्याल. आवडीच्या पदार्थांवर ताव माराल. मित्रांशी वाद घालू नयेत. जमिनीच्या कामातून लाभ होऊ शकतो.

Advertisement

▪️ कर्क : मानसिक चंचलता जाणवेल. बोलताना भान राखावे. अघळ-पघळ गोष्टी बोलू नका. अनाठायी खर्च करू नका. कामाच्या ठिकाणी बदलाचे वारे वाहू लागतील. आर्थिक उन्नतीसाठी आजचा दिवस आपणास अनुकूल आहे. स्वतःचे प्रयत्न स्वतःच करावेत.

▪️ सिंह : नवीन काम सुखावणारे असेल. मानसिक चांचल्य राहील. व्यवसाय वाढीसाठी जास्त परिश्रम घ्यावे लागतील. उपासना मार्गातील लोकांना चांगली अनुभूती मिळेल. कामाचा लोड किती आहे यावरून नियोजन करा. मित्रांची छान साथ लाभेल.

Advertisement

▪️ कन्या : तरुण वर्गाचे विचार जाणून घ्याल. काही नवीन ओळखी होतील. आपल्या काही इच्छा मनाप्रमाणे पूर्ण होतील. चालून आलेल्या संधीला अनुकूल बनवाल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. तुमचा दर्जा सुधारला जाईल. झोपेची तक्रार जाणवेल.

▪️ तूळ : नवीन कामात गढून जाल. अधिकारी लोकांशी भेट होईल. आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. तरुणांचे लग्न ठरतील. गोड बोलण्यातून लोक संग्रह वाढेल. कमिशनमधून लाभ मिळवाल. पत्नीचा वरचष्मा राहील.

Advertisement

▪️ वृश्चिक : टोकाची भूमिका घेऊ नका. वाढीव मेहनत करावी लागू शकते. आधी केलेल्या कामाची वरिष्ठांकडून प्रशंसा केली जाईल. विरोधकांवर मात कराल. वडिलोपार्जित कामातून लाभ संभवतो. भावंडांशी वाद घालू नका. गुंतवणुकीच्या योजना सावधपणे कराव्यात.

▪️ धनू : अचानक पैसे येतील. काही कामे कमी कष्टात पार पडतील. कथित गोष्टीवर विश्वास ठेऊ नका. आध्यात्मिक आवड वाढेल. काही कामे सकाळीच पूर्ण करा. काही बाबतीत आपल्याला चांगला दिलासा मिळणार आहे. पित्त विकार वाढू शकतात.

Advertisement

▪️ मकर : प्रशंसेचा दिवस. भावनिक वळणे येऊ शकतात. दांपत्य जीवन आनंददायी राहील. कामात सुलभता येईल. शेजार्‍यांचा त्रास होण्याची शक्यता. जनसंपर्कातून कामे करावी लागतील. प्रवास सुखकर होईल.

▪️ कुंभ : मौजमस्ती कराल. स्वत:ला नियमात बांधू नका. जोडीदाराची प्रगती होईल. मानसिक अस्थिरता जाणवेल. नोकरीत सुवर्णसंधीचा लाभ घ्याल. नवीन कामात प्रचंड उत्साह जाणवेल. कार्यक्षेत्रात मान, सन्मानाचे योग येतील.

Advertisement

▪️ मीन : सुसंवादातून लाभ होतील. घरातील कामात मन गुंतवाल. विरोधक शांत राहतील. अपेक्षित गाठीभेटी होण्यास अनुकूल काळ आहे. संतसज्जनांचा सहवास लाभेल. महत्वाकांक्षी योजना अंमलात आणाव्यात. परिश्रम करत राहाल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁 ब्रेकिंग, आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजन 🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/Spreadit 

Advertisement