SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अंबानींच्या घराजवळ त्या कारचे सस्पेन्स कायम, महत्वाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती

मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाजवळ एका बेवारस कारमध्ये जिलेटिनच्या 20 कांड्या आढळून आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास सुरू केला आहे.

परिसरातील एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून त्याची पडताळणी केली असता बुधवारी मध्यरात्रीनंतर 1 वाजताच्या सुमारास ही स्कॉर्पिओ येथे उभी करण्यात आली व त्याच्या मागोमाग एक इनोव्हा कारही होती, असे स्पष्ट झाले आहे. हे सीसीटीव्ही फुटेज तपासात महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे.

Advertisement

धक्कादायक म्हणजे कारमध्ये एक धमकीचं पत्र आढळलं आहे तसेच काही नंबर प्लेटही आढळल्या आहेत. त्यातील काही नंबर प्लेट अंबानी यांच्या सुरक्षा ताफ्यातील नंबर प्लेटशी मॅच होत असल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

अंबानी यांच्या निवासस्थानासमोरील एका दुकानातील सीसीटीव्हीत पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत.

Advertisement

या फुटेजची पडताळणी केली असता बुधवारी मध्यरात्रीनंतर 1 वाजताच्या सुमारास ही कार येथे पार्क करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. स्कॉर्पिओच्या मागे एक इनोव्हा कारही होती. जिथे नो पार्किगचा बोर्ड आहे तिथे स्कॉर्पिओ पार्क करण्यात आली.

गाडीतून काही वेळ कुणीही उतरलं नाही. मात्र, लाइट्स बंद करण्यात आल्या. तितक्यात मागे असलेली इनोव्हा पुढे निघून गेली, असे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Spreadit

Advertisement