Take a fresh look at your lifestyle.

कंडक्टरची बसमध्येच आत्महत्या, चार पानांची सुसाईड नोट मध्ये धक्कादायक खुलासा

0

नांदेडमध्ये एका एसटी कंडक्टरने बसमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संजय जानकर असं या कंडक्टरचं नाव असून एसटीमधील घंटा वाजवण्याच्या दोरीनेच त्यांनी गळफास घेऊन जीवन संपवलं. संजय जानकर यांनी लिहिलेली चार पानांची सुसाईड नोटही सापडली आहे.

54 वर्षीय संजय जानकर यांनी आज पहाटे आत्महत्या केली. जानकर यांनी चार पानांची सुसाईड नोट लिहून गळफास घेतला. संजय जानकर हे नांदेडमधील माहूर आगारात कार्यरत होते. त्यांच्याजवळील तिकीटामध्ये मोठी तफावत आढळली होती. त्यामुळे कामावरुन आपल्याला काढलं जाईल या भीतीने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं कळतं.

Advertisement

संजय जानकर यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये परिवहन मंडळाला जबाबदार धरलं आहे. तिकीट काढण्याचे मशीन सतत बिघडतं. त्यामुळे तिकीटांमध्ये तफावत आढळून आली आहे. काही चूक नसताना निलंबन होऊन समाजात बदनामी होईल या भीतीपोटी त्यांनी आत्महत्या केली.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/Spreadit

Advertisement

Leave a Reply