SpreadIt News | Digital Newspaper

📣 ब्रेकिंग 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

0

10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. आधीच्या संभाव्य वेळापत्रकाबाबत 22 मार्चपर्यंत लेखी स्वरूपात सूचना मागविण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या सूचनांनुसार हे नवे वेळापत्रक अंतिम करण्यात आलेले आहे.

नव्या वेळापत्रकानुसार 10 वीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार आहे, तर 12 वीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे रोजी होणार असल्याचं राज्याच्या शिक्षण बोर्डानं सांगितलंय.

Advertisement

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा घेण्यात येतात.

कोविड 19 च्या संदर्भात केंद्र आणि राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती शिक्षण विभागानं दिलीय.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/Spreadit

 

Advertisement