Take a fresh look at your lifestyle.

🎒 1 मार्च पासून शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णयाची जबाबदारी असणार स्थानिक प्रशासनावर!

0

”राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ही परिस्थिती पाहता स्थानिक प्रशासनाने जिल्ह्यातील स्थितीनुसार येत्या सोमवारपासून म्हणजे 1 मार्च पासून आवश्यकता भासल्यास आणि परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा,” असा आदेश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरूवारी दिला आहे.

मुंबई, पुणे यांसह अनेक शहरांमधील शाळा सध्या कोरोनाचा प्रभाव वाढू लागल्याने बंद आहेत. त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभाग आणि अन्य अधिकाऱ्यांच्या उच्च पातळीवर वारंवार बैठका होत आहेत.

Advertisement

दरम्यान 1 मार्चपासून शाळा बंद ठेवण्याच्या निर्णय घेण्याची जबाबदारी शिक्षण मंत्र्यांनी स्थानिक प्रशासनावर सोपवली आहे.

राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांना कोरोना ची लागण झाल्याचे लक्षात येत आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास शेवटी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य सर्वाधिक महत्त्वाचे आहे, ही बाब लक्षात ठेवावी लागेल असे देखील शिक्षणमंत्र्यांनी नमूद केले.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/Spreadit

Advertisement

Leave a Reply