SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुम्हाला झोपेत बडबड करण्याची सवय आहे का ? मग ‘ही’ सवय घालविण्यासाठी करा असं काही..

तुम्हा अनेकांना रात्रीची बडबड करण्याची सवय जास्त असते. पण आपण ही झोपेतल्या बदबडीबद्दल बोलतोय. होय! कारण आपल्यापैकी बहुतांश जणांना झोपेत बडबड करणाऱ्या लोकांची चीड येत असेल कारण ते आपली झोप मोडतात आणि याचे त्यांना मात्र भानच उरत नाही.

आपल्या आजूबाजूला असे अनेक नमुने असतात, कि ते रात्रीचे बडबड करत असतात आणि इतरांची झोप हि मोड करत असतात. काही भयानक वास्तव वाटणारी स्वप्नं त्यांना झोपेत पडतात त्यामुळे कधी कधी त्यांना झोपेतून जाग येते.

Advertisement

आपल्या आजूबाजूला असे कोणी झोपलेले आढळले की, आपल्याला खूप त्रास होतो, आपली झोप मोडते. त्याच्यापासून दूर झोपावे किंवा त्याला आपल्यापासून दूर लोटावे असं वाटत असतं. पण खूपच महत्वाचे म्हणजे रात्रीच्या वेळी बडबड केली जाऊ नये, म्हणून काय उपाय करता येऊ शकतात. याकडे आपण लक्ष द्यावे.

काही लोक झोपेत जास्त बडबड करतात त्याला पॅरासोमिया असं म्हंटलं जातं. ह्याचे प्रमाण लहान मुलांमध्ये जास्त आढळते. आपण रात्री झोपताना मेंदूमध्ये डेल्टा व्हेन ची स्थिती असते.

Advertisement

आपल्याला 2 प्रकारची स्वप्न पडतात –

सायकॉलॉजिकल म्हणजे विचारांशी निगडित स्वप्न जसे की रडण्याचे स्वप्न, मृत्यू या प्रकारची भावनांशी जुडलेले असते. भौतिक स्वप्न म्हणजे यात आपण स्वप्नात चालतो फिरतो, खेळतो, काहीतरी क्रिया करत असतो.

Advertisement

ज्या दिवशी स्वप्न आणि वास्तविकतेचे संतुलन बिघडते तेव्हा झोपेत चालणे, बोलणे, कोणाला मारणे ह्या गोष्टी घडतात. हे कधीतरी होत असेल तर ठीक आहे. हे जर रोज होत असेल तर तुम्ही स्वतःची दिनचर्या तपासली पाहिजे. त्यामुळे कधी कधी ते फ़ार धोकादायक असते.

झोपेतील बडबड टाळण्यासाठी काय करावं ?

Advertisement

झोपण्याच्या आधी तुम्ही ध्यान करू शकता. याचा चांगला उपयोग होईल.

शांतता भंग न करणारे, छान, सुरेल असे शांत संगीत ऐकू शकता.

Advertisement

जेवणानंतर रात्री बाहेर पायी फिरणे किंवा शतपावली करा.

झोपण्यापूर्वी अर्धा ते 1 तास आधी मोबाईल किंवा टीव्ही पाहू नका.

Advertisement

झोपण्याअगोदर तुम्ही पुस्तक वाचू शकता.

रात्री जेवण कमी करा किंवा पोट गच्च होईल एवढं जेवू नका.

Advertisement

रात्री तोंड, हात-पाय धुवून प्रसन्न वाटेल मग त्यांनतर झोपा.

झोपण्यापूर्वी कमीत कमी अर्धा ग्लास पाणी प्या.

Advertisement