SpreadIt News | Digital Newspaper

💬 सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकताना सावधान; केंद्रसरकारने जाहीर केली आहे कडक नियमावली!

0

भारतात सोशल मीडियाला व्यापार करण्यासाठी मोठी सूट देण्यात आली आहे ही चांगली गोष्ट असली तरी देखील अनेकदा, सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट पाहायला मिळतात.

एखादा मजकूर धर्माला, भावनेला, व्यक्तीला दुखावणारा असू शकतो आणि याद्वारे सामाजिक तेढ निर्माण होऊ शकते.

Advertisement

देशहितासाठी देखील अनेकदा अनेक पोस्ट चांगल्या नसतात. देशाचे सार्वभौमत्व त्याचबरोबर नागरिकत्व याला धक्का पोहोचणाऱ्या गोष्टी सोशल मीडियाद्वारे समोर येतात.

केंद्राने आता विशेष नियमावली सोशल मीडिया कंपन्यांसाठी जाहीर केली आहे. याबाबतची माहिती रविशंकर प्रसाद यांनी दिली!

Advertisement

👉 सोशल मीडिया कंपन्यांसाठी नियमावली

1. तक्रार निवारण व्यासपीठ आणि त्यासाठी असणारे अधिकारी यांची नेमणूक करावी लागेल. ज्याद्वारे, तक्रारींची नोंद 24 तासात होईल आणि त्याचे निवारण 15 दिवसात करण्यात येईल.

Advertisement

2. सोशल मीडियावर पडणारा एखादा मजकूर जर युजर्सच्या किंवा कोणाच्याही आत्मसन्मानाला धक्का पोहोचणार असेल; आणि विशेषतः महिलांच्या, तर तो मजकूर तक्रार आल्यानंतर 24 तासाच्या आत काढून टाकावा लागेल.

3. भारतात चीफ कम्प्लायन्स ऑफिसर, नोडल कॉन्टॅक्ट पर्सन आणि रेसिडेंट ग्रीव्हन्स ऑफिसरची नियुक्ती सोशल मिडिया कंपन्यांना करावी लागेल.

Advertisement

4. युजर्सकडून येणाऱ्या तक्रारींचा अहवाल दर महिन्याला सादर करावा लागेल, आणि या तक्रारींचे निवारण कसे करण्यात आले याचा देखील उल्लेख त्या अहवालात टाकावा लागेल.

5. सोशल मीडियावर जर आक्षेपार्ह मजकूर आढळून आला तर त्याचा मुख्य स्रोत कोठून आहे? हे सांगावे लागेल. जर हा स्रोत भारताबाहेर असेल तर भारतात पहिल्यांदा सोशल मीडियावर कोणी हा मजकूर टाकला याचीही माहिती द्यावी लागेल.

Advertisement

6. युजर्सचं व्हेरिफिकेशन जर केलं गेलं तर ते कोणत्या मार्गाने केलं गेलं, त्याची माहिती द्यावी लागेल.

7. जर कुठल्या युजरचा डेटा किंवा ट्वीट किंवा मजकूर सोशल मीडिया वरून हटवला गेला, तर ते सोशल मिडीयाला युजरला सांगावं लागेल आणि त्याची सुनावणी करावी लागेल.

Advertisement

 

 

Advertisement