SpreadIt News | Digital Newspaper

शेतकऱ्यांनो.. तुमच्या खात्यात पंतप्रधान किसान निधीचा आठवा हप्ता आला का? ‘असं’ तपासून घ्या..

0

शेतकऱ्यांनो ! तुमच्या खात्यात पंतप्रधान किसान निधीचा आठवा हप्ता आला का, ‘असं’ तपासून घ्या..

केंद्र सरकार दरवर्षी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत करत असते. याआधी केंद्र सरकारने एकूण 7 हप्ते थेट शेतकऱ्यांच्या अकाऊंटवर पाठविले आहेत. आता लवकरच 8 वा हफ्ताही हस्तांतरित केला जाणार आहे. अशा परिस्थितीत आपण अद्याप स्वत:या योजनेत नोंदणी केली नसेल तर ताबडतोब नोंदणी करा म्हणजे तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येईल.

Advertisement

तुमचं नाव आहे का ? असं तपासा..

– पंतप्रधान किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Advertisement

वेबसाईटच्या मेनपेजवर आपल्याला Farmers Corner चा पर्याय दिसेल.

Farmers Corner विभागात तुम्हाला Beneficiaries List च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

Advertisement

त्यानंतर तुम्हाला ड्रॉप डाऊन यादीतून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडावे लागेल.

यानंतर तुम्हाला गेट रिपोर्टवर क्लिक करावे लागेल.

Advertisement

यानंतर लाभार्थ्यांची संपूर्ण यादी समोर येईल. ज्यामध्ये आपण आपले नाव तपासून घ्या.

नोंदणी ‘अशी’ करा-

Advertisement

पीएम किसानच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.

Farmers Corner वर जा.

Advertisement

तुम्ही ‘ New Farmer Registration ‘ पर्यायावर क्लिक करा.

यानंतर आधार क्रमांक भरावा लागेल.

Advertisement

यासह, कॅप्चा कोड भरून राज्याची निवड करा आणि पुढील प्रक्रिया करून घ्या.

आता या फॉर्ममध्ये आपण आपली सर्व वैयक्तिक माहिती भरा.

Advertisement

बँक खात्याचा तपशील आणि फील्डची माहिती भरावी लागेल.

यानंतर आपण फॉर्म सबमिट करू शकता.

Advertisement

तुमच्या बँक खात्यात 8 वा हफ्ता कधी येणार ?

केंद्र सरकार शेतकाऱ्यांसाठी एप्रिल महिन्यापासून 8 वा हफ्ता द्यायला सुरूवात करेल, अशी माहीती आहे. लहान आणि सीमांत शेतकर्‍यांना या योजनेमधील आठवा हफ्ता होळीनंतर मिळू शकेल.

Advertisement

या योजनेमधून एप्रिल ते जुलै दरम्यान एक हफ्ता, ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यानचा दुसरा हफ्ता व डिसेंबर ते मार्चपर्यंत वर्षाचा तिसरा हफ्ता तुम्हाला येऊ शकतो. तसेच, आता डिसेंबर-मार्च 2020-21 पर्यंत आतापर्यंत 9.45 कोटी शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत केंद्र सरकार प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना 6 हजार रुपये देते. याआधी सरकारचे उद्धिष्ट शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आहे, म्हणून केंद्र सरकार हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करते. केंद्र सरकार एका वर्षामध्ये 3 हफ्त्यात हे 6 हजार रुपये देते.

Advertisement

एक हप्ता 4 महिन्यांत येतो. प्रत्येक हफ्त्यात 2 हजार रुपये दिले जातात. समजा जर शेतजमिनीचा मालक शासकीय कर्मचारी असेल किंवा त्या कर्मचाऱ्याने सेवानिवृत्ती घेतली असेल तर त्याला या योजनेचा फायदा मिळणार नाही. या नव्या नियमानुसार जर शेतकर्‍याच्या नावावर शेती नसेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. शेती त्यांच्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या नावावर असली तरीदेखील तो या योजनेस अपात्र ठरतो.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/Spreadit

Advertisement

 

 

Advertisement