SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कोरोना पासून दूर राहण्यासाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल सायन्स कडून खास सूचना जारी; काय आहेत सूचना जाणून घ्या!

महाराष्ट्रासह भारतभरात या आठवड्यात अनेक कोरोनाग्रस्त आढळून येत आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या जशी जशी वाढत आहे, तशी तशी प्रत्येकाच्या मनातील भीती देखील वाढत आहे. काही प्रमाणात निष्काळजीपणा आणि काही प्रमाणात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे कोरोनाग्रस्त वाढताना दिसत आहेत.

मात्र, या सगळ्यात लॉकडाउन सदृश्य स्थिती असताना कोरोना पासून दूर कसे राहायचे, याविषयी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल सायन्स कडून काही महत्त्वाच्या सूचना येत्या दोन वर्षाच्या कालावधीसाठी देण्यात आल्या आहेत.

Advertisement

या सूचनांचे पालन करून तुम्ही कोरोना पासून स्वतःचा बचाव करू शकता. काय आहेत या सूचना आणि त्याचे पालन कसे कराल जाणून घ्या!

 • येतात दोन वर्षासाठी अनावश्यक प्रवास टाळायला इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल सायन्स कडून सांगण्यात आले आहे.
 • घराच्या बाहेर पडताना तोंडावर मास्क आणि जवळ सॅनिटायझर बाळगायला विसरू नका.
 • सणसमारंभ किंवा मग लग्न जिथे गर्दी जास्त असेल अशा ठिकाणी वर्षभर तरी जाणे टाळा.
 • सोशल डिस्टंसिंग चे पालन शिस्तीने करा.

 

Advertisement
 • बाहेरून घरात येताना बूट आणि चपला दाराच्या बाहेर सोडा.
 • येणारा आठवडा स्वतःची आणि कुटुंबाची व्यवस्थित काळजी घ्या. तुमच्या आजूबाजूला कोणतीही गडबड होणार नाही याची जबाबदारी घ्या.
 • येणाऱ्या वर्षभरात अनावश्यक रीत्या बाहेर जाणे देखील टाळा. बाहेर जाताना स्वतःजवळ घड्याळ किंवा अंगठी अशा गोष्टी सहसा बाळगू नका. बाहेर मोबाईलचा वापर देखील तात्पुरताच करा.

 

 • येणारे सहा महिने सिनेमागृह, पार्टी किंवा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा किंबहुना जाऊच नका.
 • ज्या व्यक्तीला खोकला येत असेल अशा व्यक्ती पासून दूर राहा.
 • कोरोना सदृश्य व्यक्ती किंवा संशयित व्यक्ती जवळून गेली असे जरी लक्षात आले तरी देखील तात्काळ आंघोळ करा.

 

Advertisement
 • बाहेरून घरात येताना स्वतःची स्वच्छता हीच कुटुंबाची सुरक्षा आहे हे लक्षात ठेवा. घरात आल्या आल्या हातपाय तोंड धुऊन स्वतःचे कपडे देखील धुऊन टाका.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/Spreadit

Advertisement