SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या…

🗓️ बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

मेष : चांगल्या कामासाठी पैसे खर्च होतील. विशेष मान, सन्मान मिळतील. घरगुती वापराच्या वस्तु खरेदी कराल. मुलांचे धाडस वाढेल. गुरूजनांचा आशीर्वाद मिळेल.

Advertisement

वृषभ : स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. गोंधळलेल्या अवस्थेत शांत होऊन विचार करा. घरातील कुरबुरीमध्ये लक्ष घाला. मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात.

मिथुन : आवडीचे काम करायला मिळेल. जुन्या अडकलेल्या पैशाचे व्यवहार मार्गी लावा. जुन्या गोष्टीत अडकून पडाल. घरातील प्रश्नांकडे प्राधान्याने लक्ष द्यावे.

Advertisement

कर्क : टीकेकडे दुर्लक्ष करावे लागेल. महत्त्वाच्या विषयावर चर्चा होईल. जवळच्या व्यक्तीकडून आपण फसत नाही ना याचा अंदाज घेऊन पुढे जा.

सिंह : आध्यात्मिक आवड वाढील लागेल. ध्यान-धारणेसाठी वेळ काढा. नोकरीत-व्यवसायात आपल्या कामाच्या संदर्भात प्रशंसा होईल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.

Advertisement

कन्या : चपळाईने कामे हाती घ्याल. आत्मविश्वासाने कार्यरत राहावे. अनोळखी आजारांना वेळीच बाजूला सारा. छोटे प्रवास घडतील. तुमची धार्मिकता वाढेल. चांगले साहित्य वाचाल.

तूळ : जुने वाद मिटू शकतील. आपल्या छानशौकीवर आपला दिवस आनंदात घालवाल. आकर्षणाला बळी पडाल. स्थावरच्या कामाला गती येईल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल.

Advertisement

वृश्चिक : सामाजिक क्षेत्रात उत्तम अधिकार प्राप्त होतील. भागीदारीत योग्य मोबदला पदरात पडेल. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. मुलांचे विचार विरोधी वाटू शकतात.

धनु : उत्तम संधी उपलब्ध होतील. संधीचे सोने करणे आपल्या हातात राहील. आहारातील पथ्ये ना चुकता पाळा. तुमच्या संपर्कातील लोकात वाढ होईल. मुलांशी क्षुल्लक कारणावरून वाद संभवतो.

Advertisement

मकर : महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. जोडीदाराशी मैत्रीपूर्वक व्यवहार करा. कामातील ऊर्जा वाढेल. घरात नातेवाईक गोळा होतील. कामाचा आनंद घेता येईल.

कुंभ : वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे ठरेल. पथ्यपाणी, औषधे चुकवू नयेत. स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो.

Advertisement

मीन : गरजूंना प्राधान्याने मदत करावी. वाट पाहात असलेले निर्णयाचे उत्तर मिळेल. ओळखीतून कामे पार पडतील. दिवस आळसात जाईल. कलेचे योग्य मूल्यमापन केले जाईल.

Advertisement