SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

😱 कोरोनावरील औषधाबाबतचा पतंजलीचा दावा खोटा, मग खरं काय?

💁🏻‍♂️ पतंजली आयुर्वेद कंपनीने ‘कोरोनिल’ची निर्मिती केली आहे. कोरोनिल औषधाला जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणिकरणानुसार आयुष मंत्रालयाने मान्यता दिल्याचा पतंजली आयुर्वेद कंपनीचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

🙌 केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत कोरोनिल औषध बाजारात दाखल करण्यात आल्याने आरोग्यमंत्र्यानीच उघडपणे देशवासीयांची दिशाभूल केल्याचा आरोप ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) केला आहे.

Advertisement

📃 आयएमए’ने जारी केलेल्या निवेदनात काय म्हटलं..?

कोरोना उपचारांसाठी कोणत्याही पारंपरिक औषधाच्या वापराला मान्यता दिलेली नाही किंवा त्याबाबत अभ्यासही झालेला नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने ट्विटरच्या माध्यमातून रविवारी स्पष्ट केले. आरोग्य संघटनेचे हे स्पष्टीकरण म्हणजे भारताला दिलेली चपराक आहे. त्यामुळे जागतिक वर्तुळात भारताचा अवमान झाल्याचे ‘आयएमए’ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

Advertisement

💉 लसीकरणाची गरज नाही का?

आरोग्यमंत्री स्वत: अ‍ॅलोपॅथी डॉक्टर असल्याने त्यांनी या नियमांचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांनी स्पष्टीकरण करावे, अशी मागणी ‘आयएमए’ने केली आहे. कोरोना प्रतिबंधासाठी हे औषध उपयुक्त असेल तर लसीकरणावर सरकार 35 हजार कोटी रुपये का खर्च करत आहे? आरोग्यमंत्री जर औषधाचा प्रचार-प्रसार करत असतील तर लसीकरणाची आवश्यकता नाही का, असे प्रश्नही ‘आयएमए’ने उपस्थित केले आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/Spreadit
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 जाहिरातीसाठी संपर्क – 9130040464

Advertisement