SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या…

🗓️ मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

मेष : नोकरीत कामाचा ताण जाणवेल, जबाबदारीची कामे करावी लागतील. नोकरीत वरिष्ठ महत्वाच्या कामांची जबाबदारी सोपवतील. भावाबहिणींशी भावनिक उद्रेक होणार नाही याची दक्षता घ्या.

Advertisement

वृषभ : महत्वाचे निर्णय शांत विचारपूर्वक घरातील मोठ्या व्यक्तिच्या सल्याने घेणे आवश्यक आहे. आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. उधारी उसनवारी वसूल होईल. अनपेक्षित धनलाभ होईल.

मिथुन : एखादा निर्णय अनपेक्षितपणे झटपट घेतला जाईल. भविष्यात त्याचा उपयोग होईल. नवीन कल्पना आकार घेतील. सतत शुभशकुनांचा सतत प्रत्यय येईल. गुरुची कृपा आपल्या प्रयत्नांना यश देईल.

Advertisement

कर्क : भरपूर काम करायचे आणि गृहसौख्याचा आस्वाद घ्यावयाचा असे मनोमन ठरवाल. आपणांस विचारपूर्वक गुंतवणूकीचा निर्णय घ्यावा लागेल. प्रतिष्ठीत व्यक्तीच्या ओळखीतून कामे मार्गी लागतील.

सिंह : अचानक परिचित व्यक्तिकडून आर्थिक सहकार्य मिळेल. कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी आपली निवड होईल. उधारी पैसे देण्याचे शक्यतो आज टाळा. आपली आजवर रेंगाळलेली कामे प्रतिष्ठित व्यक्तिंच्या मदतीने पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल.

Advertisement

कन्या : अपेक्षित गाठीभेटी घडल्यामुळे आप्तस्वकियांचे सहकार्य मिळेल. आज किंमती वस्तूंची खरेदी करणे टाळावे. उद्योग व्यापारात नवीन काही प्रकल्प, योजना करण्यास चांगली वेळ आहे.

तूळ : जोडीदाराशी महत्वाच्या विषयावर चर्चा करताना मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्या. आपण हाती घेतलेले काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सहाय्यकांची मदत मोलाची ठरणार आहे.

Advertisement

वृश्चिक : साचेबद्ध जीवनातून विरंगुळा मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. अचानक सहलीचे आयोजन केले जाईल. आजचा दिवस आपल्याला मोठी खरेदी करण्यास अनुकूल आहे.

धनु : मन अस्वस्थ होईल. संतसज्जनांचा सहवास लाभेल. नवीन व्यावसायिक करार घडतील. प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल.

Advertisement

मकर : आपले निर्णय योग्य ठरतील. नातेवाईकात गैरसमज निर्माण होतील. दुसऱ्यांकडून काम करुन घेण्यात यशस्वी व्हाल. तब्येतीविषयी डॉक्टरांकडून वेळच्या वेळी तपासणी करुन घ्या.

कुंभ : मित्रपरिवाराबरोबर वेळ मजेत घालवाल. आपले आरोग्य उत्तम राहिल. संततीसंबंधी सुवार्ता कानी येतील. कामानिमित्त प्रवास घडून येतील.नवनवीन अनुकूल घडामोडी घडतील.

Advertisement

मीन : उपासना मार्गातील लोकांना चांगली अनुभूती मिळेले. आज आपण जास्त शारिरीक कष्ट घेऊ नका. घरात शुभसमारंभाचे आयोजन केले जाईल. घरातील वातावरण आनंदी राहील. मातृसौख्य लाभेल.

Advertisement